मुंबई - सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तसेच, नागरिकांना सुरक्षा पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कलाविश्वातील कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगन, माधुरी दिक्षित, आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसह बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे.
कार्तिक आर्यनने आपल्या हटके स्टाईलमध्ये व्हिडिओ पोस्ट करुन नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -कोरोनामुळे मिळालेल्या वेळेचा सलमान खानने 'असा' केला उपयोग, पाहा व्हिडिओ
अमिताभ बच्चन यांनी देखील व्हिडिओद्वारे खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
अनिल कपूर यांनी हात धुण्याविषयी माहिती दिली आहे. तर, माधुरी दिक्षितने खोकताना रुमाल किंवा टिशू पेपरचा वापर करावा, असा सल्ला दिला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोष्टीक अन्न खाण्याविषयी सांगितले आहे.
वरुण धवनने अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, आजारी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात जाऊ नये, असेही म्हटले आहे.
अर्जून कपूरने लहान मुले आणि विशेषत: वृद्ध लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आयुष्मानने घरात राहण्याचा सल्ला दिला आहे.
आलिया भट्टनेही चेहरा आणि हातांची स्वच्छता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
तर अजय देवगनने नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. 'स्वस्थ राहा, सुरक्षित राहा', असा संदेश त्याने दिला आहे.
सर्व मिळून आपण या कोरोना विषाणूचा सामना करुयात, कोरोनाशी लढुयात, असा संदेश या कलाकारांनी नागरिकांना दिला आहे.
-
T 3476 - T 3476 - -The film fraternity pleads and cautions for safety and precaution .. on CoVid 19 .. an initiative by the Industry and the CM Maharashtra pic.twitter.com/xjZsBI2diu
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">T 3476 - T 3476 - -The film fraternity pleads and cautions for safety and precaution .. on CoVid 19 .. an initiative by the Industry and the CM Maharashtra pic.twitter.com/xjZsBI2diu
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 20, 2020T 3476 - T 3476 - -The film fraternity pleads and cautions for safety and precaution .. on CoVid 19 .. an initiative by the Industry and the CM Maharashtra pic.twitter.com/xjZsBI2diu
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 20, 2020
हेही वाचा -बॉलिवुडच्या प्रसिद्ध गायिकेला कोरोनाची लागण