मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर एकेकाळी आघाडीच्या नायिकामध्ये गणली जात होती. आपल्या निरागस अभिनयाने आणि सौंदर्याने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. आज जरी ती चित्रपटा पासून लांब असली तरी तिच्या फॅन फॉलोईंग ची संख्या मोठी आहे. लाईम लाईट पासून दूर गेल्यानंतर मला कधीही या गोष्टीचं वाईट वाटलं नाही, असं करिश्मा म्हणाली आहे. आपल्या मुलांसाठी तिने हा निर्णय घेतला होता, असे सांगत तिने बऱ्याच गोष्टीचा उलगडा केला आहे.
करिश्मा 2012 साली 'डेंजरस इश्क या चित्रपटात शेवटची झळकली होती. मुलांना वाढताना पाहण्याची संधी गमवायची नव्हती त्यामुळे चित्रपटात काम करणं थांबवलं, असे ती म्हणाली.
मुलांना सांभाळणं, घर सांभाळणं ही खरंतर फार मोठी जबाबदारी आहे. मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा होता, मुलांसोबत वेळ घालवायचा होता. त्यामुळे चित्रपटापासून दूर जाण्याचं मला वाईट वाटलं नाही.
90 च्या दशकात करिश्माने 'कूली नंबर वन', 'जीत', 'राजा हिंदुस्थानी', 'हम साथ साथ है', 'दिल तो पागल हैं', 'हिरो नंबर वन', 'फिजा' आणि 'झुबैदा' यासारख्या चित्रपटातून लोकप्रियता मिळवली होती.
आता डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मदरहूड' असे या वेब सीरिजचे नाव आहे. एकता कपूरच्या अल्ट बालाजी या प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज पाहता येईल.
'या वेब सीरिज मध्ये काम करू शकेल की नाही याबाबत सुरुवातीला शंका होती. मात्र एकता ने कथा सांगितल्यानंतर मला ती खूप आवडली आणि मी पुन्हा अभिनय करण्यासाठी तयार झाली', असेही करिश्मा ने सांगितले.
रितू भाटियाने या वेब सीरिज चे लेखन केले आहे. तर, करिश्मा कोहली यांनी दिग्दर्शन केले आहे.