मुंबई - बॉलिवूडची 'निरजा' म्हणजेच सोनम कपूरचा आज वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. कलाकारांचे या पार्टीतील फोटोही समोर आले होते. अशात आता करिश्माने सोनमसोबत आपले काही खास फोटो पोस्ट केले आहे.
करिश्माने शेअर केलेल्या काही फोटोमध्ये मलायका, आनंद अहूजा, करण जोहर, वरूण धवन, महिप कपूर आणि रिआ कपूर हे कलाकारदेखील दिसत आहेत. सोनमसोबत खास रविवार असं कॅप्शन देत करिश्मानं हे फोटो शेअर केले आहेत.



या व्यक्तींच्या सानिध्यात आजची संध्याकाळ मजेशीर गेली, असंही तिनं म्हटलं आहे. याशिवाय एका फोटो करिश्मा जान्हवी कपूर आणि खूशी कपूर यांच्यासोबत पोज देताना दिसत आहेत. 'बाहुल्या' असं कॅप्शन देत तिनं हा फोटो शेअर केला आहे.

