ETV Bharat / sitara

Kareena Maid COVID Positive : करीनाच्या मोलकरणीला कोरोना, अभिनेत्रींच्या संपर्कातील 110 लोक निगेटिव्ह - Corona infection from Bollywood party

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ( Bollywood Actress Kareena Kapoor Omicron Positive ) आणि अमृता अरोरा ( Bollywood Actress Amruta Arora Omicron Positive ) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. अमृता अरोराची बहीण मलायका अरोरा ( Bollywood Actress Malayka Arora Corona ) आणि आलिया भट्ट ( Bollywood Actress Alia Bhatt Corona ) यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. परंतु करीनाची मोलकरीण कोविड पॉझिटिव्ह ( Kareena maid tests COVID positive Mumbai )आढळली आहे. बीएमसीने मंगळवारी 110 लोकांची आरटी पीसीआर चाचणी घेतली होती. त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत.

करीना कपूर
करीना कपूर
author img

By

Published : Dec 15, 2021, 3:44 PM IST

Updated : Dec 15, 2021, 4:10 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये शिरकाव केला आहे. करीना कपूरसह 4 सेलेब्स करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. बीएमसी ( Brihanmumbai Municipal Corporation ) अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मोठी बातमी समोर आली आहे की, करीना कपूरनंतर तिची मोलकरीणही या विषाणूच्या विळख्यात ( Kareena maid tests COVID positive Mumbai ) आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबाची आणि कर्मचाऱ्यांची आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये मोलकरीण कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे.

करीनाच्या मोलकरणीला कोरोनाची लागण, मलायका आणि आलियाचा रिपोर्ट निगेटिव्ह

अमृता अरोराची बहीण मलायका अरोरा हिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मलायकाची बहीण अमृता अरोरा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. आलिया भट्टचाही कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बीएमसीने मंगळवारी 110 लोकांची आरटी पीसीआर चाचणी घेतली होती. त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत.

करीनाची मोलकरीण आणि सीमा खानची बहिण आधीच पॉझिटिव्ह

करीनाची मोलकरीण आणि सीमा खानची बहिण आधीच पॉजिटिव्ह आल्या होत्या. त्यांच्या संपर्कात येऊन करीना कपूर आणि अमृता अरोरा पॉजिटीव्ह आल्याचे समजते. करीना कपूर अमृता अरोरा सीमा खान यांच्या इमारती सील करण्यात आल्या होत्या.

प्री-ख्रिसमस पार्टीतून झाला कोरोनाचा संसर्ग

करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत मलायका, अमृता, करीना कपूर, अर्जुन कपूर, महीप कपूर, सीमा खान, आलिया भट्ट सहभागी झाले होते. त्याचबरोबर मलायका, करिश्मा, अमृता, करिश्मा, मसाबा गुप्ता, पूनम दमानिया यांनी रियाच्या घरी आयोजित प्री-ख्रिसमस पार्टीला हजेरी लावली होती. पार्टी संपली पण आता बॉलिवूडच्या या सेलेब्सना त्याची किंमत मोजावी लागणार आहे.

करण जोहरच्या पार्टीतून कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. येथे सीमा खानला पहिल्यांदा कोरोना झाला, तिच्या संपर्कात आल्यानंतर करीना-अमृता यांना कोरोना झाला. करण जोहरचीही कोविड चाचणी करण्यात आली. पण त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे.

हेही वाचा - Ankita Lokhande Marriage Photos : अंकिता विकी लग्नबंधनात, पाहा लग्नसोहळ्यातील काही खास फोटो

Last Updated : Dec 15, 2021, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.