मुंबई - अभिनेत्री सारा अली खान आणि करिना कपूर खान रेडिओ शोच्या निमित्ताने एकत्र दिसल्या. दोघींच्या भेटीचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. शूटींग संपल्यानंतर दोघेही बाहेर पडताना व्हिडिओत दिसतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
करिना आणि साराच्या या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दर्शवलीय. भरपूर कॉमेंट्स मिळत आहेत. सेलेब्रिटी पेज २ ने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात सारा चेक्सचा शर्ट आणि सिमरी शॉर्टमध्ये सुंदर दिसत आहे. करिनाही आपल्या लूकमधून ग्लॅमरस दिसत आहे.
तामचा विचार करता सारा अली खान आगामी लव्ह आज कल या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. तर करिना अलिकडेच प्रदर्शित झालेल्या गुड न्यूजमध्ये दिसली होती. करिना लवकरच लाल सिंह चढ्ढा या चित्रपटात आमिर खानसोबत दिसणार आहे.