ETV Bharat / sitara

करण जोहर बॉलिवूडमध्ये घेऊन येतोय अजून एक स्टार-कीड, शनाया कपूर! - शनाया कपूर कपूर करणार बॉलिवूड पदार्पण

संजय कपूरची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. करण जोहर तिला आगामी सिनेमात संधी देत आहे. धर्ममा प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटातून ती रुपेरी पडद्यावर अवतरेल.

Shanaya Kapoor
शनाया कपूर
author img

By

Published : Mar 24, 2021, 12:49 PM IST

गेल्या वर्षी स्टार-किड्स आणि इतर कलाकार यावर बरंच चर्वितचर्वण झाले होते. करण जोहर, जो जवळपास सगळ्या स्टार-किड्सना लाँच करण्यासाठी ओळखला जातो, त्यांची पाठराखण करताना दिसला व त्यामुळे ट्रोलही झाला. परंतु आता नवीन वर्ष सुरु झालंय आणि पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. करण जोहर अजून एका स्टार कीडला लाँच करण्यास सज्ज झाला आहे. स्टार-किड्सचा संरक्षक करण जोहर आपल्या बॅनर ‘डीसीए स्क्वाड’ तर्फे अजून एक स्टार किड घेऊन येत आहे.

शनाया कपूर
अनिल कपूर आणि बोनी कपूरचा धाकटा भाऊ संजय कपूरची मुलगी शनाया कपूरला लवकरच करण जोहर लाँच करणार आहे. बॉलिवूड तयारीच्या व्हिडिओत शनाया एकदम कॉन्फिडन्ट वाटतेय आणि करणने तिची स्तुती करत म्हटलेय, ‘उत्साही, निश्चिन्तता, लवचिकता आणि चमकदार व्यक्तित्व असलेली शनाया कपूर लवकरच मोठा पडदा काबीज करण्यासाठी सज्ज दिसत आहे. ती धर्मा मुव्हीज सोबत आपल्या पहिल्या चित्रपटाचा प्रवास करण्यास तयार आहे. त्या चित्रपटाच्या घोषणेची वाट पहा.’
Shanaya Kapoor
शनाया कपूर

हेही वाचा - टायगर श्रॉफ सुरु करतोय ‘हिरोपंती २’ चे शूटिंग!

शनायाची आई महीप कपूरनेदेखील काही महिन्यांपूर्वी ‘फॅबुलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाईव्ह्ज’ मधून अभिनय-पदार्पण केले होते व त्या शोचा निर्माता देखील करण जोहरच होता. आईपाठोपाठ करण आता तिच्या मुलीच्या पदार्पणातही मदत करतोय. शनायाचे एक काका बोनी कपूर निर्माते आहेत, दुसरा काका अनिल कपूर सुपरस्टार आहे तसेच तिचे चुलत भाऊ-बहीण अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर, हर्षवर्धन कपूर आणि सोनम कपूर अहुजा चित्रपटसृष्टीत जम बसवून आहेत. त्यातच तिचे वडील संजय कपूर सुद्धा सध्या अभिनयाची दुसरी इनिंग्स खेळताहेत. घरातच एव्हडे स्टार्स असताना शनायाला स्टारडम मिळविणे फारसं जड जाऊ नये.

Shanaya Kapoor
शनाया कपूर
करण जोहरच्या आशीर्वादाने शनाया कपूर आपल्या पहिल्या चित्रपटाचा प्रवास धर्मा मुव्हीज च्या धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी (डीसीए) तर्फे या जुलैमध्ये सुरू करण्यास सज्ज आहे.
Shanaya Kapoor
शनाया कपूर

हेही वाचा - ‘कोण होणार करोडपती' ला मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.