मुंबई - आगामी 'सुर्यवंशी' चित्रपटात अक्षय कुमार अजय देवगण आणि रणवीर सिंग या तीन सुपरस्टार्सना एका चित्रपटात एकत्र आणण्याची किमया रोहित शेट्टीने बजावल्याबद्दल करण जोहरने भरपूर कौतुक केले. रोहितमुळेच हे तिघे एकत्र आल्याचे करणने सांगितले. 'सुर्यवंशी'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी तो बोलत होता.
करण म्हणाला, ''हे रोहित शेट्टीचे जग आहे. या तिघांना एकत्र आणण्यात माझा काही हात नाही. तो फक्त एकच व्यक्ती आहे आणि आम्हाला आनंद आहे की, तो आमच्यासोबत आहे. हा माणूस ( रोहित शेट्टी ) सर्टिफिकेटसह रॉकस्टार आहे. माझं म्हणणं आहे की, अशा प्रकारचे जग बनवण्यासाठी खास टॅलेंट आणि क्षमतेची आवश्यकता असते. आणि तो हे दरवर्षी करीत असतो.''
करण पुढे म्हणाला, ''मी गेल्या पाच वर्षात एकही फिल्म बनवली नाही आणि रोहितने २००० कोटी रुपये कमावले.'' सिंघम', 'सिम्बा'नंतर रोहित शेट्टीचा हा साहसी पोलीस कथा असलेल्या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण, गुलशन ग्रोव्हर, सिकंदर खेर यांच्या भूमिका आहेत.
'सुर्यवंशी' हा चित्रपट २४ मार्च २०२० ला रिलीज होणार आहे.