ETV Bharat / sitara

मादाम तुसाँद संग्रहालयात करणच्या पुतळ्याचे अनावरण, पाहा फोटो - madame tussauds

मादाम तुसाँद या संग्रहालयात आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, अनुष्का शर्मा, हृतिक रोशन अशा अनेक सेलिब्रिटींचे पुतळे ठेवण्यात आले आहेत.

करणचा पुतळा
author img

By

Published : Apr 4, 2019, 10:31 AM IST

मुंबई - मादाम तुसाँद संग्रहालयात अनेक कलाकारांच्या पुतळ्यांचे अनावरण आतापर्यंत केले गेले आहे. अशात आता याठिकाणी दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या पुतळ्याचीही एन्ट्री झाली आहे. करणचे या पुतळ्यासोबतचे फोटो चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शेअर केले आहेत.

या पुतळ्याचे उद्घाटन करताना करणची आई हिरु जोहरही उपस्थित होती. पुतळ्याच्या अनावरणासाठी करण सध्या सिंगापूरमध्ये गेला आहे. या पुतळ्याजवळ जेव्हा करण जोहर उभा राहिला तेव्हा पुतळा कोण आणि खरा करण कोण हे क्षणभर लक्षातही येणार नाही, इतका हुबेहुब पुतळा साकारण्यात आला आहे.

सेल्फी पोजच्या या पुतळ्यासह करण आणि त्याच्या आईनेही फोटो काढला आहे. मादाम तुसाँद या संग्रहालयात आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, अनुष्का शर्मा, हृतिक रोशन अशा अनेक सेलिब्रिटींचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. आता या पुतळ्यांमध्ये करण जोहरच्या पुतळ्याचीही भर पडली आहे.

Intro:Body:

karan johar, unveiling, wax statue, madame tussauds, singapore

karan johar at the unveiling of his wax statue at madame tussauds

मादाम तुसाँद संग्रहालयात करणच्या पुतळ्याचे अनावरण, पाहा फोटो

मुंबई - मादाम तुसाँद संग्रहालयात अनेक कलाकारांच्या पुतळ्यांचे अनावरण आतापर्यंत केले गेले आहे. अशात आता याठिकाणी दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या पुतळ्याचीही एन्ट्री झाली आहे. करणचे या पुतळ्यासोबतचे फोटो चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शेअर केले आहेत.

या पुतळ्याचे उद्घाटन करताना करणची आई हिरु जोहरही उपस्थित होती. पुतळ्याच्या अनावरणासाठी करण सध्या सिंगापूरमध्ये गेला आहे. या पुतळ्याजवळ जेव्हा करण जोहर उभा राहिला तेव्हा पुतळा कोण आणि खरा करण कोण हे क्षणभर लक्षातही येणार नाही, इतका हुबेहुब पुतळा साकारण्यात आला आहे.

सेल्फी पोजच्या या पुतळ्यासह करण आणि त्याच्या आईनेही फोटो काढला आहे. मादाम तुसाँद या संग्रहालयात आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, अनुष्का शर्मा, हृतिक रोशन अशा अनेक सेलिब्रिटींचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. आता या पुतळ्यांमध्ये करण जोहरच्या पुतळ्याचीही भर पडली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.