ETV Bharat / sitara

'अँग्री बर्डस २'च्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज देणार कपिल शर्माची टीम - हॉलिवूड

हॉलिवूडचा प्रसिद्ध अॅनिमेटड चित्रपट अँग्री बर्डच्या दुसऱ्या भागाच्या हिंदी व्हर्जनसाठी कपिल आपला आवाज देणार आहे. कपिलशिवाय कपिल शर्माच्या टीममधील इतर सदस्यही या चित्रपटांतील पात्रांना आवाज देणार आहेत.

'अँग्री बर्डस २'च्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज देणार कपिल शर्माची टीम
author img

By

Published : Jul 26, 2019, 2:08 PM IST

मुंबई - आपल्या जबरदस्त कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळख मिळवणारा कलाकार म्हणजेच कपिल शर्मा. आता हाच कपिल कॉमेडीपाठोपाठ आपल्या आवाजानेही प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाला आहे. हा आवाज तो कोणत्या गाण्याला नाही तर एका चित्रपटाला देणार आहे.

हॉलिवूडचा प्रसिद्ध अॅनिमेटड चित्रपट अँग्री बर्डच्या दुसऱ्या भागाच्या हिंदी व्हर्जनसाठी कपिल आपला आवाज देणार आहे. कपिलशिवाय कपिल शर्माच्या टीममधील इतर सदस्यही या चित्रपटांतील पात्रांना आवाज देणार आहेत. यात अर्चना पुरान सिंग आणि किकू शारदा यांचाही समावेश आहे.

या सिनेमातील रेड नावाच्या पात्रासाठी कपिल, झेटा नावाच्या पात्राला अर्चना तर लिओनार्डला किकू आपला आवाज देणार आहे. येत्या २३ ऑगस्टला हा सिनेमा हिंदी, तेलुगू आणि तमिळसह इंग्रजीमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.