मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगन रनौत सध्या तिच्या आगामी 'थलायवी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती जयललीता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कंगनाने तब्बल २० किलो वजन वाढवले आहे. कंगनाची बहीण रंगोली चंडेलने कंगनाचे काही फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.
'थलायवी' चित्रपटानंतर कंगना 'तेजस' आणि 'धाकड' यांसारख्या चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातही तिची दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. रंगोलीने कंगनाचे काही जुने फोटो देखील शेअर केले आहे. या जुन्या फोटोंमध्ये कंगनाचा स्लिम अवतार पाहायला मिळतो. तर, आता वाढलेल्या वजनासह देखील तिचा लुक समोर आला आहे.
-
Only last schedule to go for #Thalaivi Kangana has gained 20 kgs weight, After 2 months she starts #Tejas & #Dhaakad.... will she be able to shed that weight, let’s see 😛 pic.twitter.com/CC410XdPuj
— Rangoli Chandel (@Rangoli_A) March 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Only last schedule to go for #Thalaivi Kangana has gained 20 kgs weight, After 2 months she starts #Tejas & #Dhaakad.... will she be able to shed that weight, let’s see 😛 pic.twitter.com/CC410XdPuj
— Rangoli Chandel (@Rangoli_A) March 4, 2020Only last schedule to go for #Thalaivi Kangana has gained 20 kgs weight, After 2 months she starts #Tejas & #Dhaakad.... will she be able to shed that weight, let’s see 😛 pic.twitter.com/CC410XdPuj
— Rangoli Chandel (@Rangoli_A) March 4, 2020
हेही वाचा -'अंग्रेजी मेडियम' नव्या गाण्यावर थिरकल्या आलिया, कॅटरिना, अनुष्का, जान्हवीसह दिग्गज अभिनेत्री
विशेष म्हणजे अवघ्या २ महिन्यानंतर तिच्या 'तेजस' आणि 'धाकड' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी कंगनाला वाढलेले वजन कमी करावे लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच 'थलायवी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात जयललीता यांच्या राजकिय आणि चित्रपट कारकिर्दीतील महत्वपूर्ण घडामोडी दाखवण्यात येणार आहेत. के. व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि रजत अरोरा यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. २६ जून २०२० ला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
हेही वाचा -पुरुष प्रधान समाज नेहमी पुरुषांना महत्त्व देतो - श्रृती हासन