ETV Bharat / sitara

सुशांतसिंहचा मृत्यू आत्महत्या नसून तो सुनियोजित मर्डर - कंगना रनौत

सुशांतसिंह राजपूत यांचा मृत्यू आत्महत्या नसून तो सुनियोजित मर्डर होता असा आरोप कंगना रनौतने केला आहे. फिल्म इंडस्ट्रीत नव्या टॅलेंडेड कलाकारांना स्थान नसल्याचे ती म्हणाली. सुशांतच्या कामाची दखल इंडस्ट्रीने घेतली नाही. त्याला आजपर्यंत इतक्या चांगल्या भूमिका करुनही कोणताही पुरस्कार दिला गेला नाही. त्याच्यावर सतत अन्याय केला जात होता. एकप्रकारे आत्महत्येकडे प्रवृत करणारी ही फिल्म इंडस्ट्रीतील घराणेशाही असल्याचे कंगनाचे म्हणणे आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन फिल्म इंडस्ट्रीवर सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर तोफा डागल्या आहेत.

File photo
सुशांत सिंह राजपूत
author img

By

Published : Jun 15, 2020, 5:23 PM IST

Updated : Jun 15, 2020, 5:52 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर कंगना रनौतने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर घराणेशाही जोपासल्यामुळे गुणवंत कलाकारांवर आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढवतो असे म्हटले आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करुन सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून तो सुनियोजित मर्डर असल्याचा आरोप केला आहे. सुशांतसिंह राजपूत गेल्या पाच-सात वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करतोय. त्याला कोणीही गॉडफादर नव्हता त्यामुळे त्याच्या कामाची दखल घेतली गेली नाही, असे कंगना म्हणाली. आजवर त्याला कोणताही पुरस्कार न मिळल्याचा उल्लेख करत फिल्म इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर तिने टीकास्त्र सोडले आहे.

सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील व्हिडिओ बोलताना कंगना म्हणाली, ''सुशांतसिंह राजपूतच्या मृत्याने आपल्या सर्वांना हादरवून सोडलंय. त्याच्या आत्महत्येनंतर काहीजण म्हणत आहेत की, ज्याच्या मनाची स्थिती कमजोर असते, जे डिप्रेशनमध्ये असतात असे लोक आत्महत्या करतात. परंतु मला सांगा जो रँक होल्डर आहे, इंजिनिअर आहे त्याच्या मनाची स्थिती कशी काय कमजोर असू शकते. गेल्या काही काळापासून सुशांत लोकांना विनंती करीत होता की माझे चित्रपट पाहा. माझा कोणी गॉडफादर नाही, मला या इंडस्ट्रीतून काढून टाकले जाईल. तो आपल्या मुलाखतीतून जाहीर करीत होता की, ही इंडस्ट्री मला का आपले मानत नाही. त्याला आतापर्यंतच्या कामाबद्दल कोणताही पुरस्कार मिळाला नाही. त्याच्या काय पो छे सिनेमाच्या पदार्पणाची दखलही घेतली गेली नाही. केदारनाथ, धोनी किंवा छिछोरे यासारख्या सिनेमाला कोणताही पुरस्कार मिळाला नाही. गली बॉयसारख्या फालतू सिनेमाला सर्व पुरस्कार मिळतात. छिछोरे ही बेस्ट फिल्म होती त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही.'' फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी सुशांत सिंह राजपूतवर अन्याय केल्याचे कंगना स्पष्ट म्हणाली. इतकेच नाहीतर त्याचा मृत्यूचे कारण आत्महत्या नसून ती थंड डोक्याने केलेला खुन आहे, असेही कंगना म्हणाली.

कंगना पुढे म्हणते, ''आम्हाला तुमच्याकडून दुसरे काही नको. पण आम्ही स्वतः करतो तेव्हा त्याचे अक्नॉलेड्जमेंट का मिळत नाही? मी स्वतः फिल्म डिरेक्ट करते. माझ्यावर सहा केसेस का टाकल्या. का मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला. यांचे जे चमचे जर्नॅलिल्ट आहेत ते सुशांतसारख्या लोकांबाबत आंधळेपणाने लिहितात की तो सायकॉटिक आहे, न्यूरॉटिक आहे, अॅडिक्ट आहे. संजय दत्तची अॅडिक्शन तर तुम्हाला फार क्यूट वाटते? ते लोक मला मेसेज करतात की तुझा खूप डिफिक्ल्ट टाईम चाललाय, तू असे तसे पाऊल उचलू नकोस, असे हे लोक मला का सांगतात? का माझ्या डोक्यात घालतात की मी आत्महत्या केली पाहिजे? तर हा सुसाईड नव्हे तर प्लॅन्ड मर्डर होता. सुशांतची चूक ही आहे की यांची गोष्ट त्याने मानली. ते म्हणाले की तू वर्थलेस आहेस, ती गोष्ट त्याने मान्य केली. ते नेहमी त्याला आईच्या गोष्टीचे आठवण देत होते आणि म्हणत होते की, तुझे काहीच होणार नाही ही गोष्ट त्याने मान्य केली. त्यांना वाटतं की ते इतिहास लिहितील की, सुशांत कमजोर डोक्याचा होता. ते हे सांगणार नाहीत की सत्य काय आहे. त्यामुळे आपल्याला ठरवायचंय की कोण इतिहास लिहिणार? आम्ही ठरवणार ते...''

कंगनाच्या या स्फोटक वक्तव्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली आहे. यापूर्वी कंगनाने करण जोहरवर असाच घराणेशाहीचा आरोप केला होता. आत्ताचे हे आरोपही त्याच दिशेने अंगुलीनिर्देशन करीत असल्याचे मानले जात आहे. कंगनाच्या या भूमिकेवर अद्याप कोणीही फिल्म इंडस्ट्रीतील जबाबदार व्यक्तीने प्रतिक्रिया दिलेली नाही.

Last Updated : Jun 15, 2020, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.