मुंबई - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या 'थलायवी' या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका केल्यांतर अभिनेत्री कंगना रणौतला इंदिरा गांधीची भूमिका साकारण्याचे वेध लागले आहेत. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आगामी चित्रपटात भूमिका करणार असल्याची बातमी देणाऱ्या कंगनाने आता या चित्रपटाची तयारीही सुरू केली आहे.
कंगना रणौतने बुधवारी, 'इमर्जन्सी' च्या तयारीची झलक इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केली होती. तिच्या बॅनर मणिकर्णिका फिल्म्स प्रॉडक्शनच्या वतीने दोन छोटे व्हिडिओ शेअर केले होते. पहिल्या व्हिडिओसोबत तिने लिहिले होते, "@मणिकर्णिका फिल्म्समध्ये काय चालले आहे याचा अंदाज लावा." काही मिनिटांनंतर तिने दुसरा व्हिडिओ पोस्ट केला ज्यात तिने 'इमर्जन्सी' चा प्रवास सुरू करण्याची घोषणा केली. "'इमर्जन्सी' चित्रपटासाठी बॉडी स्कॅन करते, मॅडम पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी."
कंगनाने इन्स्टाग्रामवरही काही इमेजीस शेअर केल्या आणि सांगितले की 'इमर्जन्सी' हा एक 'खूप खास' चित्रपट असेल. या प्रतिमा शेअर करताना कंगनाने लिहिले की, "प्रत्येक पात्र एका नवीन प्रवासाची एक सुंदर सुरुवात असते. इमर्जन्सी # इंदिराचा प्रवास सुरु केला आहे, फेस स्कॅन, शरीर आणि कास्ट यातून योग्य लूक मिळतो. अनेक अफलातून कलाकार एकत्र येऊन आपले व्हिजन पडद्यावर जिवंत करतात. हे सर्व अतिशय खास असेल. @मणिकर्णिका फिल्म्स."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या वर्षाच्या सुरुवातीला कंगनाने सांगितले होते की ती इंदिरा गांधीची भूमिका साकारणार आहे, पण हा चित्रपट बायोपिक असणार नाही. रिपोर्टनुसार या आगामी चित्रपटात भारतीय राजकीय इतिहासाच्या महत्त्वपूर्ण क्षणांचा समावेश असेल ज्यात ऑपरेशन ब्लू स्टार आणि आणि बाणीचा समावेश आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या अभिनेत्री कंगनाने म्हटलंय की हा एक भव्य राजकीय नाट्य असलेला चित्रपट असेल.
२०१४ मध्ये आलेल्या कंगनाच्या 'रिव्हॉल्व्हर राणी' या चित्रपटाचा दिग्दर्शक साई कबीर 'इमर्जन्सी' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. पटकथाही तोच लिहिणार आहे.
सध्या कंगना 'धाकड' या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाला एक स्पाय थ्रिलर म्हणून ओळखण्यात येत आहे. रजनेश रझी घई दिग्दर्शित हा चित्रपट १ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 'धाकड' व्यतिरिक्त कंगनाच्या हातामध्ये थलायवी आणि तेजस या चित्रपटांचा समावेश आहे.
हेही वाचा - शिवराळ अभिनेत्री पायल पुन्हा खातेय तुरूंगाची हवा : सुंभ जळेल पण पीळ जात नाही