मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत हिने सांगितले की कोरोनाची बाधा झाल्यानंतर १० दिवसांनी टेस्ट केली असता निगेटिव्ह चाचणी आल्याचे सांगितले आहे. ८ मे रोजी तिला कोरोनाची लागण झाल्यानंतर ती होम क्वारंटाईनमध्ये राहात होती.
या महिन्याच्या सुरुवातीस नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल तिचे ट्विटर अकाऊंट कायमचे निलंबित झाले होते. त्यामुळे कंगनाने तिचे हेल्थ अपडेट इन्स्टाग्रामवर दिले आहे.
आपण कोरोनाचा परभाव केल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेम याबद्दल तिने सर्वांचे आभार मानले आहेत.
अभिनेत्री कंगना रणौतचे ट्विटर हँडल बंद करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.अभिनेत्री कंगना रणौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.