नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या बेताल वक्त्यांमुळे चर्चेत आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. कंगना मुंबईमध्ये पोहचली असून तीने आपल्या ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या कार्यालयातील तोडफोडीचे व्हिडिओ टि्वटरवरून शेअर केले आहेत. #deathofdemocracy या हॅशटॅगसह तीने अवघ्या 8 मिनिटांत 4 टि्वट केले आहे.
-
#DeathOfDemocracy pic.twitter.com/cpv0A1TJjy
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#DeathOfDemocracy pic.twitter.com/cpv0A1TJjy
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020#DeathOfDemocracy pic.twitter.com/cpv0A1TJjy
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
-
#DeathOfDemocracy pic.twitter.com/Ts5GP9deOh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#DeathOfDemocracy pic.twitter.com/Ts5GP9deOh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020#DeathOfDemocracy pic.twitter.com/Ts5GP9deOh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
-
#DeathOfDemocracy pic.twitter.com/9jPsCDYYrH
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#DeathOfDemocracy pic.twitter.com/9jPsCDYYrH
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020#DeathOfDemocracy pic.twitter.com/9jPsCDYYrH
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
आज पुन्हा कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान म्हटलं आहे. मी कधीच चूकीच नव्हते. मुंबई आता पीओके झाली आहे, असे कंगनाने टि्वट केले आहे. तसेच तिने या सोबत #deathofdemocracy (लोकशाहीची हत्या) हा हॅशटॅगही पोस्ट केला आहे.
माझे कार्यालय माझे राम मंदिर आहे. आज तिथे बाबर पोहोचला असून आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल. मात्र, बाबर लक्षात ठेव. हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, असे टि्वट कंगनाने केले आहे. माझ्या कार्यालयात कोणेतही बेकायदेशीर बांधकाम नव्हते. तसेच कोरोनामुळे सरकारने येत्या 30 स्पटेंबरमध्ये कोणतेही बांधकाम पाडण्यास बंदी केली आहे, असे टि्वट तीने केले आहे.
शिवसेना विरुद्ध कंगना असे चित्र सध्या तयार झाले आहे. त्यातच तिच्या मुंबईतील ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या कार्यालयात बेकायदेशीर काम केल्यामुळे तिला पालिकेने नोटीसदेखील बजावली होती. मात्र, त्यावर तीच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने आज तीचे कार्यालय तोडण्यात येत आहे.
दरम्यान, कंगना विमानाने चंदीगड वरून मुंबईत दाखल होणार आहे. तिला 'वाय' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कंगना रणौत मंडीहून चंदीगड विमानतळाकडे रवाना झाली आहे. कंगना रणौतने बुधवारी सकाळी ट्विटरवरून आपण मुंबईत येणार असल्याचे सांगितले. "मी झाशीच्या राणीचे शौर्य आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडले. तरीही मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून अडवण्यात येत आहे, हे दुःखद आहे. मात्र मी राणी लक्ष्मीबाईंनी दाखवलेल्या मार्गावरच चालत राहणार, आणि चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणार; जय महाराष्ट्र, जय शिवाजी!" अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.