ETV Bharat / sitara

कंगना रनौतने बहिण रंगोलीच्या घराचे बनवले इंटिरिअर डिझाईन - Kangana Ranaut latest news

कंगना रनौतने बहिण रंगोली चंदेलसाठी घराचे इंटिरिअर डिझाईन बनवले आहे. रंगोलीने फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत एक पोस्ट लिहिली आहे. यात तिने स्वर्ग असे वर्णन केले आहे.

Kangana Ranaut
कंगना रनौत
author img

By

Published : May 30, 2020, 7:55 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतने बहिण रंगोली चंदेलसाठी घराचे इंटिरीयर डिझाईन बनवले आहे. स्वर्ग असे याला शीर्षक देत तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून कंगना डेकोरेशन करीत असताना दिसून येत आहे. रंगोलीने तिच्यावर कॅमेरा नेताच तिने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. काम सुरू करण्यापूर्वी रंगोलीच्या आवडी निवडींबद्दल कंगनाला सर्व माहिती होते, असे रंगोलीने म्हटलंय.

"जेव्हा तिने मला विचारले, की मला कशा प्रकारचे इंटिरिअर आवडेल, तेव्हा मी म्हणाले, जुनाट, थकलेल्या फाटलेल्या गोष्टी आवडत नाहीत. मला नेमके काय आवडते हे सांगता येत नाही परंतु मला तिचा चेहरा आठवतो, ती तिच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होती, ती अविरतपणे यावर काम करत होती आणि आज जेव्हा मी तिला फायनल टच देताना पाहिले तेव्हा मी दंग होते. मी एक गोष्ट सांगू शकते, हे माझे घर नाही, हे स्वर्ग आहे, एक आशीर्वाद आहे ... भिंती पेंटिंगची प्रतीक्षा करीत आहेत, हीटर निश्चित करणे आवश्यक आहे, ती आपल्या स्वत: च्या हातांनी सर्व काही घडवत आहे. मला धीर निघत नाही. हे सर्व जेव्हा तयार होईल तेव्हा पोस्ट करेन," असे रंगोलीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, कंगनाने मुंबईच्या पाली हिलमध्ये एक नवीन पॉश प्रॉपर्टी घेतली असून यावर 48 कोटी रुपयांचे बांधकाम करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.