मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये भूकंप आला आहे. इंडस्ट्रीतून अनेक प्रकारच्या गोष्टी उघड होताना दिसत आहेत. प्रस्थापित निर्मात्यांवर प्रचंड आरोप केले जात आहेत. अभिनेत्री कंगना रानावतने पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करुन सुशांतच्या आत्महत्येवर प्रश्न चिन्ह उभे केले आहेत.
कंगनाने सुशांतचे वडील व अंकिता लोखंडे तसेच अभिषेक कपूर यांच्या विधानांचा उल्लेख करीत सुशांतला कशा प्रकारे त्रास दिला जात होता याचा पाढा वाचलाय. त्यासोबत छापून आलेल्या बातम्यांचा दाखला देत वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसनी त्याला कसा त्रास देण्याचा प्रयत्न केला याबद्दलही सांगितलंय. तिलाही कशा प्रकारे त्रास दिला जातोय याबद्दलही ती यात बोलली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कंगनाचे म्हणणे आहे की, सुशांतबद्दल खोटे नाटे पसरवण्याचा प्रयत्न मीडियातून केला गेला. मुव्ही माफियांनी पाळलेल्या पत्रकारांनी ही आगपाखड केल्याचे ती म्हणते. अशाच तीन हाजार पत्रकारांनी आपल्याला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे कंगना सांगते. सुशांतच्या मृत्यूला तिने फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना जबाबदार धरले आहे.
सुशांतसिंहचा मृतदेह १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर १५ जूनरोजी मुंबईत अंत्यसंस्कार पार पडले होते. काल त्याच्या अस्थींचे पाटण्यातील गंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले.