मुंबई - कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे गेली सात महिने कंगना रणौत शूटिंगच्या सेटपासून दूर होती. आता ती पुन्हा कामावर परतत असून 'थलायवी' या बायोपिकच्या शूटिंगमध्ये ती भाग घेणार आहे. तिने सोशल मीडियावर आपले नुकतेच क्लिक केलेले काही फोटो शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. थलायवीच्या शूटिंगसाठी ती दक्षिण भारताच्या दौऱ्यावर जात आहे.
''प्रिय मित्रांनो, आज खूप खास दिवस आहे. सात महिन्यानंतर पुन्हा कामाला सुरूवात करीत आहे. माझ्या बहुभाषिक थलायवी चित्रपटाच्या शूटिंगसाठी दक्षिण भारतात जात आहे. महामारीच्या या कठीण काळात तुमच्या आशिर्वादाची मला गरज आहे'', असे तिने ट्विटरवर लिहिले आहे.
-
Dear friends today is a very special day, resuming work after 7 months, travelling to southern India for my most ambitious bilingual project THALAIVI, need your blessings in these testing times of a pandemic.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
P.S just clicked these morning selfies hope you all like them ❤️ pic.twitter.com/drptQUzvXK
">Dear friends today is a very special day, resuming work after 7 months, travelling to southern India for my most ambitious bilingual project THALAIVI, need your blessings in these testing times of a pandemic.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 1, 2020
P.S just clicked these morning selfies hope you all like them ❤️ pic.twitter.com/drptQUzvXKDear friends today is a very special day, resuming work after 7 months, travelling to southern India for my most ambitious bilingual project THALAIVI, need your blessings in these testing times of a pandemic.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 1, 2020
P.S just clicked these morning selfies hope you all like them ❤️ pic.twitter.com/drptQUzvXK
थलायवी हा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि सुप्रसिध्द अभिनेत्री जे. जयललिता यांचा चरित्रपट आहे. याचे दिग्दर्शन ए. एल. विजय करीत आहेत. या चित्रपटाचे लेखन बाहुबली आणि मणिकर्णिका लिहिलेल्या के. व्ही विजयेन्द्र प्रसाद आणि रजत अरोरा यांनी केले आहे.
26 जून 2020 रोजी थलायवी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार होता, परंतु देशातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे चित्रपटगृहे बंद राहिली. त्यामुळे हा चित्रपट कधी रिलीज होणार याची तारीख निर्माते लवकरच जाहीर करतील.