ETV Bharat / sitara

तुम्हाला महाराष्ट्राचे ठेकेदार कोणी बनवले? कंगनाचा उद्धव ठाकरेंना सवाल - महाराष्ट्र मालक ठाकरे

एक मुख्यमंत्री असूनही देशाला विभागण्याचे काम ठाकरे करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचे ठेकेदार कोणी बनवले? ते केवळ एक जनतेचे सेवक आहेत. त्यांच्या आधी त्यांच्या खुर्चीवर कोणीतरी होते, आणि त्यांच्यानंतरही कोणीतरी असणार आहे. मग ते महाराष्ट्राचे मालक असल्याप्रमाणे का वागतायत? असे प्रश्न कंगनाने आपल्या ट्विटमध्ये विचारले आहेत.

Kangana attacks on Thackeray says he doesn't own Maharashtra
'तुम्हाला महाराष्ट्राचे ठेकेदार कोणी बनवले?' कंगनाचा उद्धव ठाकरेंना सवाल!
author img

By

Published : Oct 26, 2020, 10:17 AM IST

Updated : Oct 26, 2020, 10:26 AM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एक मुख्यमंत्री असूनही देशाला विभागण्याचे काम ठाकरे करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचे ठेकेदार कोणी बनवले? ते केवळ जनतेचे सेवक आहेत. त्यांच्या आधी त्यांच्या खुर्चीवर कोणीतरी होते, आणि त्यांच्यानंतरही कोणीतरी असणार आहे. मग ते महाराष्ट्राचे मालक असल्याप्रमाणे का वागतायत? असे प्रश्न कंगनाने आपल्या ट्विटमध्ये विचारले आहेत.

  • Look at the audacity of a working CM he is dividing the country who has made him Maharashtra ka thekedaar? He is just a public servant there was someone else before him soon he will be out someone else will come to serve the state, why is he behaving like he owns Maharashtra?

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) October 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंगना रणौतने मुंबईला अमली पदार्थांचे हब म्हटले होते. शिवाय मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीर बरोबर केली होती. त्यावर प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की "काही लोक मुंबईला अमली पदार्थांचे हब म्हणत आहेत, मात्र त्यांना माहिती नसावे की देशात सर्वाधिक गांजाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते." असे म्हणत ठाकरे यांनी कंगनाचे मूळ राज्य हिमाचल प्रदेशवर निशाणा साधला होता.

हिमाचल ही देवभूमी..

ठाकरेंच्या या हल्ल्यावर प्रत्युत्तर देत कंगना म्हणाली, की "मुख्यमंत्री साहेब, तुम्ही अत्यंत खुज्या विचारसरणीचे आहात. हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हटले जाते. या राज्यात सर्वाधिक मंदिरांची संख्या आहे, आणि राज्यातील गुन्हेगारीचा दरही कमी आहे. तसेच, राज्यात सफरचंद, किवी, डाळिंब, स्ट्रॉबेरी अशा विविध फळांचे उत्पादन घेण्याइतकी सुपीक जमीन आहे."

  • Chief Minister you are a very petty person, Himachal is called Dev Bhumi it has the maximum number of temples also no zero crime rate, yes it has a very fertile land it grows apples, kiwis, pomegranate, strawberries one can grow anything here ... cont. https://t.co/QumaLW7fbS

"एका राज्याचे प्रमुख असूनही तुम्ही दुसऱ्या राज्याबाबत असा आकसपूर्ण विचार करता हे दुर्दैवी आहे. विशेषतः त्या राज्याबाबत जिथे भगवान शिव आणि आई पार्वतीचे निवासस्थान आहे. मार्कंड्या आणि मनू ऋषींसारख्या संतांचे जे जन्मस्थान आहे, आणि पांडवांनी आपल्या वनवासातील बराच काळ ज्या राज्यात व्यतीत केला, अशा राज्याबाबत चुकीचा विचार केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला हवी!" असेही कंगनाने आपल्या ट्विट्समध्ये म्हटले आहे.

मुंबई-हिमाचल दोन्ही माझी घरे..

  • Just how beauty of Himalayas belongs to every Indian, opportunities that Mumbai offers too belongs to each one of us, both are my homes, Uddhav Thackeray don’t you dare to snatch our democratic rights and divide us, your filthy speeches are a vulgar display of your incompetence..

हिमालय पर्वतरांगांचे सौंदर्य ज्याप्रमाणे सर्व भारतीयांसाठी असते, त्याचप्रमाणे मुंबईमधील संधींवरही प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. ही दोन्ही ठिकाणी माझी घरे आहेत. लोकशाहीने मला दिलेले हक्क हिरावून घेत देशातील लोकांना विभागण्याचा प्रयत्न करु नका. तुमची घाणेरडी भाषणे ही तुमच्या अकार्यक्षमतेला उघडी पाडत आहेत, असे कंगना आपल्या ट्विटमध्ये म्हणाली.

Last Updated : Oct 26, 2020, 10:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.