ETV Bharat / sitara

बॉक्स ऑफिसवर 'कलंक'नं केलं अर्धशतक पार, जाणून घ्या कमाई - alia bhatt

पहिल्या दिवशी चित्रपटाने २१ कोटींचा गल्ला जमावला. मात्र, पहिल्याच दिवशी झालेल्या निराशेमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली

'कलंक'चं अर्धशतक पार
author img

By

Published : Apr 22, 2019, 10:53 AM IST

मुंबई - आलिया भट्ट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'कलंक' चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित झाला. मात्र, ही स्टारकास्ट पाहता चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद असमाधानकारक आहे.

पहिल्या दिवशी चित्रपटाने २१ कोटींचा गल्ला जमावला. मात्र, पहिल्याच दिवशी झालेल्या निराशेमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५४.४० कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच १०० कोटींचा गल्ला गाठण्यासाठीही आणखी काही दिवस प्रेक्षकांचा चित्रपटाला जेमतेम प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.

वरूण धवन आणि आलिया ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने चौथ्यांदा एकत्र झळकत आहे. याआधीचे त्यांचे सर्व चित्रपट सुपरहिट ठरल्याने या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होत्या. ज्या पूर्ण करण्यात हे कलाकार अपयशी ठरले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.