मुंबई - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने बुधवारी शेअर केले की तिच्या आगामी हॉरर-कॉमेडी काकुडाच्या टीमने गुजरातमधील भुज येथे शूटिंग शेड्यूल पूर्ण केले आहे. रॉनी स्क्रूवालाची निर्मिती असलेल्या या चित्रपटात रितेश देशमुख आणि साकीब सलीम यांच्याही भूमिका आहेत. काकुडा चित्रपटाचे शुटिंग जुलैमध्ये सुरू झाले होते.
सोनाक्षी सिन्हाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाच्या रॅप अप पार्टीचे फोटो पोस्ट केले आहेत. "काकुडाचे भुज शेड्यूल रॅप," असे कॅप्शन तिने फोटोंना दिलंय. चित्रपटाची टीम पार्टी करताना दिसत असलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये सोनाक्षीने वेळेचाही उल्लेख केला आहे. सोनाक्षीच्या पोस्टनुसार, टीमने भुज शेड्यूल रॅप झाल्यानंतर पहाटेपर्यंत पार्टीचा आनंद घेतला.
क्लासमेट्स, माऊली आणि फास्टर फेणे या गाजलेल्या चित्रपटाचा मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा हा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट आहे. काकुडा या चित्रपटाची कथा अविनाश द्विवेदी आणि चिराग गर्ग यांनी लिहिली आहे. हा चित्रपट 2022 मध्ये डिजिटल रीलीज होईल.
हेही वाचा - अभिनेत्री गहना वशिष्ठच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला