ETV Bharat / sitara

जजमेंटल हैं क्या ट्रेलर: राजकुमार-कंगनाची रहस्यमय कथा, उलगडणार मर्डर मिस्ट्री - rajkumar rao

जजमेंटल हैं क्या चित्रपट रिलीज डेटपासून ते शीर्षकापर्यंत अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. या सर्व वादविवादांमुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

मेंटल हैं क्या ट्रेलर
author img

By

Published : Jul 3, 2019, 11:05 AM IST

मुंबई - स्त्री या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर अभिनेता राजकुमार राव लवकरच कंगनासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. जजमेंटल हैं क्या असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून यात कंगना आणि राजकुमार पूर्वीपेक्षा वेगळ्या अंदाजात दिसत आहेत.

जजमेंटल हैं क्या चित्रपट रिलीज डेटपासून ते शीर्षकापर्यंत अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. या सर्व वादविवादांमुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरवरून हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित असणार असल्याचे दिसत आहे.

ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार पोलीस एका आरोपीचा शोध घेत आहेत. ज्याने एका व्यक्तीचा खून केला आहे. यात पोलिसांचा कंगना आणि राजकुमारवर संशय आहे. मात्र, पोलिसांसमोर हे दोघेही या प्रकरणात एकमेकांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आता नेमकं हा खून कोणी केला आणि यामागचं कारण काय? हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच कळू शकेल. येत्या २६ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.