ETV Bharat / sitara

पुन्हा दिसणार जॉनचा अॅक्शन अवतार, थ्रिलर चित्रपट 'अॅटॅक'ची घोषणा - action thriller

अॅटॅक चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या डिसेंबरमध्ये सुरुवात होत आहे. दरम्यान, चित्रपटाची कथा कोणत्या घटनेवर आधारित असणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

पुन्हा दिसणार जॉनचा अॅक्शन अवतार
author img

By

Published : Jul 13, 2019, 1:44 PM IST

Updated : Jul 13, 2019, 2:32 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या आपल्या बाटला हाऊस चित्रपटामुळे चर्चेत आहे. बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीवर आधारित या चित्रपटानंतर आता जॉन आणखी एका थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषकांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. या चित्रपटातही प्रेक्षकांना जॉनचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. सत्य घटनेवर आधारित असणारा हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असणार आहे. अॅटॅक असं शीर्षक असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्य आर आनंद करणार असून धीरज वधवान, अजय कपूर आणि जॉन अब्राहम यांची निर्मिती असणार आहे.

  • John Abraham in #Attack... The action-thriller will be directed by debutant Lakshya Raj Anand... Produced by Dheeraj Wadhawan and Ajay Kapoor [Kyta Prod] and John Abraham [JA Ent]... The two production houses had collaborated on #Parmanu and #RAW... Starts Dec 2019. pic.twitter.com/7dowRpCQDP

    — taran adarsh (@taran_adarsh) July 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

धीरज वधवान आणि अजय कपूर यांनी याआधीही जॉनच्या 'परमाणू' आणि 'रॉ' चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'अॅटॅक' चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या डिसेंबरमध्ये सुरूवात होत आहे. दरम्यान चित्रपटाची कथा कोणत्या घटनेवर आधारित असणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे जॉनच्या चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 13, 2019, 2:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.