मुंबई - ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाच्या शुटिंगला मुंबईत मार्च महिन्यात सुरुवात झाली होती. कोरोनामुळे बराच काळ याचे चित्रीकरण लांबणीवर पडले होते. परंतु शूटिंगला सुरुवातच झाल्यानंतर दिग्दर्शक मोहित सूरी खूपच उत्साही दिसत होता. आज या चित्रपटाचे शूटिंग संपल्याने त्याला मोठे समाधान झाले. सेटवरील कलाकार वटीम क्रूने केक पासून रॅपअप सेलेब्रिशन साजरे केले.
-
JOHN ABRAHAM WRAPS UP 'EK VILLAIN RETURNS' PORTIONS... #JohnAbraham had completed filming his portions for #EkVillainReturns... Costars #ArjunKapoor, #DishaPatani and #TaraSutaria... Directed by #MohitSuri... Produced by #EktaKapoor and #BhushanKumar... 8 July 2022 release. pic.twitter.com/4qhFP2LwcN
— taran adarsh (@taran_adarsh) October 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">JOHN ABRAHAM WRAPS UP 'EK VILLAIN RETURNS' PORTIONS... #JohnAbraham had completed filming his portions for #EkVillainReturns... Costars #ArjunKapoor, #DishaPatani and #TaraSutaria... Directed by #MohitSuri... Produced by #EktaKapoor and #BhushanKumar... 8 July 2022 release. pic.twitter.com/4qhFP2LwcN
— taran adarsh (@taran_adarsh) October 28, 2021JOHN ABRAHAM WRAPS UP 'EK VILLAIN RETURNS' PORTIONS... #JohnAbraham had completed filming his portions for #EkVillainReturns... Costars #ArjunKapoor, #DishaPatani and #TaraSutaria... Directed by #MohitSuri... Produced by #EktaKapoor and #BhushanKumar... 8 July 2022 release. pic.twitter.com/4qhFP2LwcN
— taran adarsh (@taran_adarsh) October 28, 2021
निरागस चेहरा आणि हॉट बॉडी यांचं अनोखं कॉम्बिनेशन असणारी दिशा पाटनी आणि हँडसम दिसणारा व हॉट बॉडी असणारा जॉन अब्राहम यांची पहिल्यांदाच जोडी जमलीय ‘एक व्हिलन रिटर्न्स’ मध्ये झळकणार आहे. हे दोघेही स्टार्स पडद्यावर आग लावताना दिसतील तसेच त्यांच्यातील हॉट केमिस्ट्री चित्रपटगृहातील गर्मी वाढविणारी असेल असे दिग्दर्शकाचे मत आहे. २०१४ साली आलेल्या व बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या ‘एक व्हिलन’ चा हा सिक्वेल असून आतापासूनच याची चर्चा सुरु झाली आहे, जॉन-दिशा कॉम्बिनेशनमुळे. त्यातच दिग्दर्शक, दोन्ही ‘व्हिलन’ चा, मोहित सूरी पडद्यावर रोमान्स इंटरेस्टिंग पद्धतीने दर्शविण्यासाठी प्रसिद्ध आहे.
निर्माते एकता कपूर आणि भूषण कुमार यांच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले असून टी-सीरिज आणि बालाजी टेलिफिल्म्स या बॅनर्सनी संयुक्तपणे निर्मिती केली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट 8 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - 'बंटी और बबली 2' ची उत्सुकता वाढली, ट्रेलरनंतर नवे पोस्टर रिलीज