ETV Bharat / state

"राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री..."; मंत्री धनंजय मुंडेंनी थेटच सांगितलं - DHANANJAY MUNDE RESIGN

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले.

Dhananjay Munde
मंत्री धनंजय मुंडे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 5:06 PM IST

Updated : Jan 28, 2025, 5:39 PM IST

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रतिक्रिया दिली. "माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही आतापर्यंत केली नाही. मी राजीनामा द्यावा की नाही द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही, याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेतील," अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईत मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

'ऑफिस ऑफ प्रॉफिट'चा मुद्दा नाही : "राखेबाबत सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी निर्णय दिलाय. थर्मल पॉवर स्टेशनमध्ये तयार होणाऱया राखेचा कचरा स्वत: खर्च करुन उचलावा, असे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. याबाबत सरकारशी त्याचा थेट संबंध नाही, त्यामुळं याबाबत 'ऑफिस ऑफ प्रॉफिट'चा मुद्दा येत नाही," असं स्पष्टीकरण मंत्री धनंजय मुंडे यांनी होत असलेल्या आरोपांवर दिलं.

मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

आमदार संदीप क्षीरसागर यांचे आरोपींसोबत संबंध : "आमदार संदीप क्षीरसागर यांचे व आरोपींचे कुठेतरी संबंध असावेत, अन्यथा जी माहिती पोलिसांना मिळत नाही ती माहिती त्यांना कशी मिळते?" असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

आरोपीला फासावर लटकवा : "काय खरं, काय खोटं, याची तपासणी करण्याची गरज आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा फास्ट ट्रँक न्यायालयाद्वारे तपास करुन फासावर लटकवा, या मागणीवर आपण पहिल्या दिवसापासून ठाम आहोत," असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं.

दमानियांनी घेतली होती पवारांची भेट : मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांची भेट घेतली होती. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांनी ही भेट घेतली. बीडमधील दहशत, पोलिसांची बेबंदशाही व मंत्री धनंजय मुंडेंविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी पवारांकडे केली होती.

हेही वाचा -

  1. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी
  2. "पहाटेचा शपथविधी ते बीड प्रकरण"; शिर्डीतील शिबिरात धनंजय मुंडेंचा रोष कोणाकडं?

Last Updated : Jan 28, 2025, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.