Body Detoxification Home Remedies: शरीरातील अशुद्धता आणि कचरा काढून टाकल्यास आरोग्य चांगलं राहतं. यासाठी शरीर डिटॉक्स करणे गरजेचे आहे. परंतु असं माणलं जातं की शरीर डिटॉक्स करायला बराच वेळ लागतो. शरीर डिटॉक्स न केल्यास शरीरात कॉलेस्ट्रॉल, मधुमेह आणि ब्लडप्रेशर संबंधित समस्या वाढू लागतात. जर तुम्हाला थकवा, मसल्समध्ये वेदना, गॅस, ब्लॉटींग तसंच सांध्यांमध्ये वेदना होत असतील तर तुमचं शरीर डिटॉक्स करण्याची वेळ आहे. तज्ञांच्या मते, जर रोज सकाळी 9 वाजेच्या पूर्वी काही गोष्टी केल्यास नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करू शकता.
- तेल ओढणे: असे म्हटले जाते की, तेल ओढणे ही एक प्राचीन आयुर्वेदिक प्रक्रिया आहे, जी शरीराच्या विशेषत: तोंडातील अशुद्धी साफ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये ही बाब प्रसिद्ध झाली आहे. एक चमचा खोबरेल तेल तोंडात टाकून दररोज १०-१५ मिनिटे गुळण्या केल्यास हानिकारक बॅक्टेरिया बाहेर निघून जातात. ही क्रिया सकाळी ७ वाजता केल्याने रात्रीपासून तोंडात साचलेली अशुद्धता निघून जाते. त्यामुळे ताज्या श्वासासोबत दात देखील स्वच्छ होतात.
- कोमट पाण्याने आंघोळ करणे: सकाळी लवकर कोमट पाण्याने आंघोळ केल्यास शरीरात साचलेली अशुद्धता आणि कचरा निघून जातो आणि आराम मिळतो. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून तणाव आणि चिंता कमी होईल. असं म्हटलं जातं की, आंघोळीच्या पाण्यात निलगिरी आणि लॅव्हेंडर सारख्या तेलाचे काही थेंब टाकल्यास चांगले परिणाम मिळतात.
- आलं आणि लिंबाचा रस प्या: रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात आलं आणि लिंबाचा रस मिसळून प्यावं. तज्ज्ञांच्या मते असं केल्यास लिंबूमध्ये मुबलक प्रमाणात असलेले व्हिटॅमिन सी शरीरातील पीएच पातळी नियंत्रणात ठेवते. तसंच हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून देखील कार्य करते. जे शरीरातील अशुद्धता काढून टाकते. तसंच, आल्याचे दाहक-विरोधी गुणधर्म पाचन तंत्र सुधारतात आणि पोट फुगणे तसंच गॅससारख्या समस्या कमी करतात.
- योगा: तंज्ञ दररोज सकाळी प्राणायामसारख्या दीर्घ श्वासोच्छवासाच्या योगासने करण्याचा सल्ला देतात. योगासनं केल्यास फुफ्फुसातील अशुद्धी बाहेर काढण्यास मदत होते आणि दाब कमी करते. यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते. तुम्ही नियमित सकाळी चार सेकंदांसाठी खोल श्वास घ्या, श्वास 7 सेकंद धरून ठेवा आणि नंतर 8 सेकंदांसाठी श्वास सोडा.
- चालणे: सकाळी नियमित चालल्यास ताजी हवा आपल्याला मिळते. ताज्या हवेत श्वास घेतल्याने शरीरातील अशुद्धता आणि कचरा नैसर्गिकरित्या बाहेर पडतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे रक्त पुरवठा आणि पाचन कार्य सुरळीत ठेवते. तसंच सकाळी उन्हात चालण्यानेही शरीराला व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळतो.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC5654187/#sec1-7