ETV Bharat / sitara

जर्सी ट्रेलर लॉन्च: शाहीद म्हणतो की वडील पंकज कपूरसोबत काम करताना भीती वाटते

शाहिद कपूरची (Shahid Kapoor) भूमिका असलेला जर्सी ( Jersey)या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. यात शाहिद पुन्हा एकदा वडील पंकज कपूरसोबत (Pankaj Kapoor) स्क्रिन स्पेस शेअर करीत आहे. वडीलांसोबत काम करतानाचा अनुभव त्याने शेअर केला आहे.

जर्सी ट्रेलर लॉन्च
जर्सी ट्रेलर लॉन्च
author img

By

Published : Nov 24, 2021, 4:38 PM IST

मुंबई - कबीर सिंग ( Kabir Sing) आणि जर्सी ( Jersey)या दोन तेलुगू रिमेक चित्रपटांमध्ये काम करणारा बॉलीवूड स्टार शाहीद कपूर (Shahid Kapoor) मंगळवारी म्हणाला की त्याला वडील पंकज कपूरसोबत (Pankaj Kapoor) स्क्रिन स्पेस शेअर करताना अजूनही भीती वाटते.

जर्सीसाठी आपल्या वडिलांसोबत पुन्हा एकत्र येत असलेल्या शाहिदने सांगितले की, जेव्हा एखाद्याचे वडीलदेखील त्याचा प्रोफेशनमध्ये असतात तेव्हा त्यांच्यासोबत काम करणे भीतीदायक असते. करंतर या पिता-पुत्र जोडीने यापूर्वी मौसम (Mausam )(2011) आणि शानदार (Shandar)(2015) मध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

"त्याच्यासोबत काम करताना अजूनही तणाव जाणवतो पण त्यांच्यासोबत काम करणे देखील आनंददायक आहे. मला त्यांच्या दरारा वाटतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप आदर असेल तेव्हा तुम्ही सक्षम बनण्याचा प्रयत्न करता, " असे जर्सी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी बोलताना शाहिद म्हणाला.

शाहिद कपूरने 2019मध्ये कबीर सिंग या चित्रपटात काम केले होते. तेलुगुमध्ये बनलेल्या अर्जुन रेड्डी (Arjun Reddy) चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होते. मूळ चित्रपटात ही मध्यवर्ती भूमिका विजय देवराकोंडाने (Vijay Devarakonda) साकारली होती. आता तो जर्सी या चित्रपटाची प्रतीक्षा करीत आहे. अभिनेता नानी (Actor Nani) याने तेलुगु जर्सीमध्ये साकारलेली क्रिकेटपटूची भूमिका शाहिद हिंदीमध्ये करीत आहे.

जर्सी एका प्रतिभावान परंतु अयशस्वी क्रिकेटपटूची कहाणी आहे, जो भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन वयाच्या तिशीनंतरच्या उत्तरार्धात मैदानावर परतण्याचा निर्णय घेतो आणि भेट म्हणून त्याच्या मुलाची जर्सी परिधान करण्याची इच्छा पूर्ण करतो.

सर्वोत्कृष्ट तेलुगु फीचर फिल्मसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दोन ट्रॉफी मिळालेल्या 2019 च्या मूळ जर्सी चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे गौतम तिन्नानौरी यांनी हिंदी आवृत्तीचे दिग्दर्शनही केले आहे.

शाहीदने सांगितले की, त्याने आपल्या व्यक्तिरेखेमध्ये येण्यासाठी काही महिने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. शालेय जीवनात भरपूर क्रिकेट खेळल्यामुळे, अत्याने सांगितले की, अनुभव उपयोगी आला, अजूनही बरेच काम करायचे बाकी आहे".

"मी 40 वर्षांचा आहे त्यामुळे खूप त्रास झाला, अंग दुखायला लागते. तुम्ही 20 वर्षांचे नाही आहात, जो बॅट उचलून खेळू शकता. क्रिकेट हे पूर्णपणे कौशल्याचा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आमच्या देशात आम्ही क्रिकेटला खूप गांभीर्याने घेतो," असेही तो म्हणाला.

शाहिदने शेअर केले की जर्सीसाठी शूट सुरू करण्यापूर्वी त्याने चार महिने नेटमध्ये सराव केला. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन उठवल्यानंतर जर्सी चित्रपटाच्या टीमने मोहालीमध्ये चित्रीकरण पुन्हा सुरू केले, तेव्हा तो पुन्हा एकदा अडीच महिने खेळला.

अल्लू अरविंद प्रस्तुत आणि अमन गिल, दिल राजू आणि एस नागा वामसी यांची निर्मिती असलेला, जर्सी हा चित्रपट 31 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा - प्रियंकाने निक जोनाससोबत घटस्फोटोच्या अफवांचे केले खंडन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.