ETV Bharat / sitara

इन्स्टाग्रामवर ४.६ कोटी फॉलोअर्स झाल्याबद्दल जॅकलिनने पोस्ट केला टॉपलेस फोटो - जॅकलिन फर्नांडिज

जॅकलिन फर्नांडिजने स्वत:चा एक टॉपलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केलाय आणि वरील भाग तिने गुलाबांच्या पुष्पगुच्छांसह झाकला आहे.

Jacqueline
जॅकलिन फर्नांडिज
author img

By

Published : Oct 24, 2020, 7:55 PM IST

मुंबई - अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने स्वत: चा एक टॉपलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. खरं तर, इन्स्टाग्रामवर तिचे ४.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. यासाठी चाहत्यांचे आभार तिने हा फोटो शेअर करुन मानले आहेत. "खूप प्रेम, धन्यवाद."असे तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

जॅकलिनचा हा सुंदर फोटो चाहत्यांना आवडलाय. यात तिने पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केलाय आणि वरील भाग तिने गुलाबांच्या पुष्पगुच्छांसह झाकला आहे.

काही महिन्यांसाठी जॅकलिन चालली बाहेर

यासोबतच जॅकलिनने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती योगाभ्यास करताना दिसली आहे, तर तिचे मित्र कपडे पॅक करताना दिसत आहेत.

तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "येणारे महिने माझे घराबाहेर असतील आणि येत्या काही महिन्यांसाठी पॅकिंगची आणि चालू आहे."

अभिनेत्री जॅकलिन आगामी 'किक 2' या चित्रपटात सलमान खानसमवेत आणि सैफ अली खानसोबत 'भूत पोलिस' चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अर्जुन कपूरसोबतही ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.