हैदराबाद - साउथ फिल्म इंडस्ट्रीतील 'बाहुबली' स्टार प्रभास आणि सुंदर दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित राधे-श्याम चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी देशभरात चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी सुरू आहे. या चित्रपटातील लव्ह साँग 'जान है मेरी' हे गाणे शुक्रवारी रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये प्रभास आणि पूजाची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
गायक अरमान मलिकने राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित राधे श्याम या चित्रपटातील 'जान है मेरी' हे नवीन गाणे गायले आहे. अमाल मलिकने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. त्याचबरोबर रश्मी विरागने या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हा चित्रपट ११ मार्चला जगभरात प्रदर्शित होणार आहे. राधे श्याम हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो तेलुगु तसेच हिंदी, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
त्याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याच्या भव्य प्रमोशनची तयारी सुरू आहे. लवकरच चित्रपटाचे प्रमोशन सुरू करण्यासाठी अभिनेता प्रभास, अभिनेत्री पूजा हेगडे आणि दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार आणि इतर देशव्यापी दौरा करणार आहेत.
'राधे श्याम'मध्ये प्रभास विक्रमादित्यच्या रूपात असून पूजा हेगडेने प्रेरणाची भूमिका साकारली आहे. विक्रमादित्य हा एक हस्तरेखाशास्त्रज्ञ आहे जो भविष्य वर्तवतो आणि भूतकाळ देखील सांगतो.
हेही वाचा - Chakda Xpress : अनुष्का शर्माची क्रिकेट नेटप्रॅक्टीस, झुलनने दिली प्रतिक्रिया