मुंबईः अभिनेता ईशान खट्टर हा आगामी युद्ध चित्रपटात ब्रिगेडियर बलरामसिंह मेहता यांची भूमिका साकारणार आहे. 'पिप्पा' नावाच्या या युद्धपटाचे दिग्दर्शन एअरलिफ्ट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक राजा कृष्णा मेनन यांनी केले आहे.
"अशा विशालतेचा आणि महत्त्व असलेल्या चित्रपटाचा भाग होण्याचा मला आनंद झाला. उत्साही टँक कमांडर कॅप्टन बलराम मेहता साकारणे मला खरोखर एक विशेषाधिकार आहे. मी पिप्पाच्या रोमांचक अनुभवाची वाट पाहत आहे," असे ईशान म्हणाला.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या 45 व्या कॅव्हलरी टँक पथकाचे अनुभवी ब्रिगेडिअर बलरामसिंग मेहता यांनी लढा दिला होता आणि चित्रपटात त्यांची कहाणी बघायला मिळणार आहे. हा चित्रपट बर्निंग चाफीज या पुस्तकावर आधारित आहे.
हेही वाचा - 'स्टंटमन' यांना मदत करण्याचे विद्युत जामवालने केले आवाहन
पिप्पा या चित्रपटाचे लेखन रवींदर रंधावा, तन्मय मोहन आणि राजा कृष्णा मेनन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे.
चित्रपटाच्या शीर्षकात रशियन वॉर टँक पीटी-76 हायलाइट करण्यात आले आहे, जो पिप्पा म्हणून लोकप्रिय आहे. या चित्रपटात बलराम मेहतांचे तरुणपण आणि तत्कालिन भारताचे चित्रण पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षी पिप्पा सिनेमागृहात येणार आहे.