ETV Bharat / sitara

ईशान खट्टरच्या हातात एकाहून एक सरस चित्रपट, सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज - ईशान खट्टर आगामी युद्ध चित्रपटात

इशान खट्टर एक अभिनेता म्हणून त्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा शोध घेत आहे. इराणी चित्रपट दिग्दर्शक माजिदी माजिदच्या 'बियॉन्ड द क्लाऊड्स'मधील अपारंपरिक पदार्पणानंतर तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अनेक दर्जोदार दिग्दर्शक, कलावंत यांच्यासोबत तो आगामी चित्रपटातून काम करीत आहे.

Ishaan Khatter
ईशान खट्टर
author img

By

Published : Aug 18, 2020, 3:02 PM IST

नवी दिल्ली - अभिनेता ईशान खट्टर ज्या प्रकारे त्याच्या बॉलिवूड कारकीर्दीची निर्मिती करत आहे त्याबद्दल आनंदी आहे. या अभिनेत्याने इराणी चित्रपट दिग्दर्शक माजिदी मजीद यांच्या ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले. ‘सैराट’ या लोकप्रिय मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘धडक’ हा त्याचा बॉलिवूड डेब्यू होता.

अलीकडेच, मीरा नायरच्या बीबीसी मिनीसिरीज 'अ सुटेबल बॉय'मध्ये त्याने तब्बूबरोबर स्क्रीन स्पेस शेअर केली. ही सिरीज विक्रम सेठ यांच्या याच नावाच्या प्रशंसित कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये ईशान खट्टरची रोमॅन्टिक झलक पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि त्याच्यापेक्षा तब्बल २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या तब्बूसोबत तो रोमान्स करताना दिसणार आहे. 'अ सूटेबल बॉय' या सीरिजमध्ये ईशान एका कॉलेजमधील विद्यार्थ्याची भूमिका साकारत आहे. तर, तब्बू ही देहविक्रय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे.

आपल्या कारकीर्दीतील आलेखांबद्दल बोलताना ईशानने सांगितले: "मला मिळालेल्या संधींमुळे मी खूप खूश आहे आणि मला याशिवाय दुसरा मार्ग मिळाला नसता. माझ्या पुढच्या चित्रपटांमधील कामामुळे मी खूप आनंदी आहे"

2021 मध्ये रिलीजसाठी तयार होत असलेल्या आगामी हॉरर कॉमेडी फोन भूत चित्रपटात इशान कॅटरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. आगामी 'खाली पीली' या रोमँटिक अॅक्शन थ्रिलरमध्ये अनन्या पांडेसोबत काम करीत आहे. 'सुलतान', 'टायगर जिंदा हैं' आणि 'भारत'सारख्या सिनेमांचे दिग्दर्शक अली अब्बास जफर या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. तर मकबूल खान यांचं दिग्दर्शन असणार आहे. ईशान आणि अनन्याच्या जोडीला पहिल्यांदाच स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

ईशान खट्टर हा आगामी युद्ध चित्रपटात ब्रिगेडियर बलरामसिंह मेहता यांची भूमिका साकारणार आहे. 'पिप्पा' नावाच्या या युद्धपटाचे दिग्दर्शन एअरलिफ्ट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक राजा कृष्णा मेनन यांनी केले आहे.

"अशा विशालतेचा आणि महत्त्व असलेल्या चित्रपटाचा भाग होण्याचा मला आनंद झाला. उत्साही टँक कमांडर कॅप्टन बलराम मेहता साकारणे मला खरोखर एक विशेषाधिकार आहे. मी पिप्पाच्या रोमांचक अनुभवाची वाट पाहत आहे," असे ईशान म्हणाला.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या 45 व्या कॅव्हलरी टँक पथकाचे अनुभवी ब्रिगेडिअर बलरामसिंग मेहता यांनी लढा दिला होता आणि चित्रपटात त्यांची कहाणी बघायला मिळणार आहे. हा चित्रपट बर्निंग चाफीज या पुस्तकावर आधारित आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.