ETV Bharat / sitara

'इंतजारी हैं तेरी', 'आर्टिकल १५' मधील लव्ह साँग प्रदर्शित - ayushmann khurana

'इंतजारी हैं तेरी' असं या गाण्याचं शीर्षक असून यात आयुष्मान आणि ईशा तलवारच्या प्रेमाची खास झलक पाहायला मिळत आहे.गाण्याला अरमान मलिकनं आवाज दिला आहे.

'आर्टिकल १५' मधील लव्ह साँग प्रदर्शित
author img

By

Published : Jun 22, 2019, 6:15 PM IST

मुंबई - आयुष्मान खुराणाची मुख्य भूमिका असलेला 'आर्टिकल १५' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढली आहे. अशात आता चित्रपटातील एक लव्ह साँग प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'इंतजारी हैं तेरी' असं या गाण्याचं शीर्षक असून यात आयुष्मान आणि ईशा तलवारच्या प्रेमाची खास झलक पाहायला मिळत आहे. हे कपल या गाण्यात एकमेकांसोबत घालवलेला खास वेळ आठवताना दिसत आहे. गाण्याला अरमान मलिकनं आवाज दिला आहे.

शकील आझमींनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर अनुराग साकीयांनी संगीत दिलं आहे. 'आर्टिकल १५' या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशतील सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात आयुषमा पोलिसाची भूमिका साकारत आहे. धर्म, जात, पंथ, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही आधारे राज्य आपल्या कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव करू शकत नाही, असे संविधानात नमूद केलेले असूनसुद्धा अनेक क्रूर घटना समाजात घडतात, यावरच या चित्रपटातून भाष्य केले जाणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.