ETV Bharat / sitara

IFFI 2021 : 20 नोव्हेंबर पासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (52nd International Film Festival)20 नोव्हेंबरपासून गोव्यात सुरुवात होत आहे. अभिनेत्री हेमा मालिनी (Actress Hema Malini) व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) या महोत्सवाचे शनिवारी उद्घाटन करणार आहेत.

20 नोव्हेंबर पासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

author img

By

Published : Nov 18, 2021, 10:12 PM IST

पणजी - भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (52nd International Film Festival) 52 वी आवृत्ती, IFFI 20 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत गोव्यात आयोजित केली जात आहे. सध्याची कोविड-19 परिस्थिती लक्षात घेता, 52 वा IFFI संकरित स्वरूपात आयोजित (Organized in IFFI hybrid form) करण्यात आल्याची माहित गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली

20 नोव्हेंबर पासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

जगभरातील कलाकारांची मांदियाळी

IFFI जगभरातील सर्वोत्कृष्ट समकालीन (The best contemporary films from around the world) आणि क्लासिक चित्रपटांचे कोलाज (Collage of classic movies) दाखवते. जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक, शिक्षणतज्ञ आणि चित्रपट रसिक एकत्र येऊन विविध चित्रपट प्रदर्शन, सादरीकरणे, मास्टर क्लासेस, पॅनेल चर्चा, सह-निर्मिती, चर्चासत्र आणि अधिकच्या माध्यमातून चित्रपट आणि चित्रपट निर्मितीची कला साजरी करतील.

यंदाचा चित्रपट महोत्सव संकरित पद्धतीने

यंदा ईफी च्या इतिहासात प्रथमच हा महोत्सव ऍमेझॉन, वुट, zee 5, vaicom सारख्या प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित करण्यात येणार असून, कोविडमुळे यंदा हा महोत्सव संकरित पद्धतीने (Organized in IFFI hybrid form) साजरा करण्यात येणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई (Subhash Phaldesai) यांनी ईटीव्ही शी बोलताना सांगितले.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपटांची प्रेक्षकांना मेजवानी

इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय विभागात सुमारे 73 देशांतील 148 चित्रपट दाखवले जाणार (148 films from 73 countries will be screened) आहेत. महोत्सवात सुमारे 12 जागतिक प्रीमियर, सुमारे 7 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 26 आशिया प्रीमियर आणि सुमारे 64 भारतीय प्रीमियर्स (64 Indian premiere movies)होतील. इफ्फीला यावेळी 95 देशांमधून 624 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

मार्टिन स्कॉर्सेस आणि इस्टेव्हन स्झाबो या दोन प्रमुख जागतिक चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना पहिल्या सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने (Satyajit Ray Lifetime Achievement Award)सन्मानित करण्यात येत आहे, अशी माहिती महोत्सव संचालकांनी दिली. "दुर्दैवाने, ते महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत, परंतु पुरस्कार स्वीकारणारे त्यांचे व्हिडिओ संदेश प्ले केले जातील".

हेही वाचा - Nusrat Bharuch Uses Pregnant Body Suit : 'छोरी'साठी नुसरत भरुचाने शूटिंगच्या २५ दिवस आधीपासूनच वापरला ‘प्रेग्नंट बॉडी सूट’!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.