ETV Bharat / sitara

'बिग बॉस'मध्ये मराठीचा अपमान, कलर्स वाहिनीने मागितली माफी - बिग बॉस १४ मधील स्पर्धक जान कुमार सानू

बिग बॉस १४ मधील स्पर्धक जान कुमार सानू याने निक्की तांबोळी या महिला स्पर्धकाला माझ्याशी मराठीत बोलू नको, हिंदीत बोल, मला मराठी ऐकून चीड येते, असे विधान केले होते. त्यानंतर मराठी भाषेचा अपमान झाल्याचे म्हणत या प्रकरणी शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली आहे. हा वाद शांत करण्यासाठी यानंतर कलर्स वाहिनीच्यावतीने वायकॉम १८ने याबाबत माफी मागितली आहे.

Colors channel apologized
कलर्स वाहिनीने मागितली माफी
author img

By

Published : Oct 28, 2020, 4:25 PM IST

मुंबई - बिग बॉस हा शो नेहमी काहीना काहीतरी कारणामुळे वादात सापडत असतो. यावेळी मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे. शोमधील स्पर्धक जान कुमार सानू याने निक्की तांबोळी या महिला स्पर्धकाला माझ्याशी मराठीत बोलू नको हिंदीत बोल, मला मराठी ऐकून चीड येते, असे विधान केले होते. यावरुन एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मराठी भाषेचा अपमान झाल्याचे म्हणत या प्रकरणी शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली आहे.

  • Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही.

    — Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) October 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

''बिग बॉस मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान जान कुमार सानूने केला, हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर, हे सहन केले जाणार नाही'', असे ट्विट शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी केले होते.

त्यानंतर या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपली आक्रमक भूमिका मांडली. मनसेच्या अमेय खोपकर यांनी ट्विट करीत लिहिलंय, ''मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं, जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल, ही माझी गॅरंटी. तुला थोबडणार लवकरच... आता आम्ही मराठी.

  • मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी.
    आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं.

    — Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं, असंही खोपकर यांनी म्हटलं आहे.

यानंतर कलर्स वाहिनीच्यावतीने वायकॉम १८ने याबाबत माफी मागितली आहे. शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एका पोस्टमध्ये माफीचे हे पत्र दिसते. कलर्स वाहिनीने मागितलेल्या या माफीमुळे शिवसेना आणि मनसेचे समाधान होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२७ तारखेला प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये मराठी भाषेबद्दल झालेल्या टिप्पणीबद्दल कलर्स वाहिनी माफी मागत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखवण्याचा हेतू यामागे नव्हता, असे कलर्सने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.