ETV Bharat / sitara

शिल्पा शेट्टीच्या १ वर्षाच्या मुलीसह कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची बाधा - शिल्पा शेट्टीच्या कुटुंबाची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर शेअर केले की तिच्या कुटुंबातील सहा सदस्यांना आणि तिच्या घरातल्या दोन कर्मचार्‍यांची कोविड -१९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बाकीचे सर्वजण बरे होण्याच्या मार्गावर असून तिची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

shilpa shetty covid positive
शिल्पा शेट्टीच्या कुटुंबाची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह
author img

By

Published : May 7, 2021, 8:48 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टी हिने शुक्रवारी जाहीर केले की पती राज कुंद्रा, मुलगा वियान-राज आणि मुलगी समिशा यांच्यासह तिच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाला आहे.

तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केलेल्या निवेदनात ४५ वर्षीय शिल्पा शेट्टीने सांगितले की तिच्या सासू-सासरे आणि आईलाही या विषाणूचा संसर्ग झालाआहे.

"शेवटचे १० दिवस आमच्यासाठी एक कुटुंब म्हणून कठीण होते. माझ्या सासऱ्यांची कोविड -१९ टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर समिशा, वियान-राज, माझी आई आणि शेवटी राज यांनाही कोरोनाची लागण झाली. सर्वजण क्वारंटाइनमध्ये राहात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या खोल्यांमध्ये ते उपचार घेत आहेत.'' असे शिल्पाने लिहिलंय.

अभिनेत्री शिल्पाच्या घरातील दोन कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावरही वैद्यकिय उपचार सुरू असल्याचे शिल्पाने सांगितले. सर्वजण बरे होण्याच्या मार्गावर असून तत्काळ मदतीसाठी आणि प्रतिसादासाठी महानगर पालिका आणि अधिकाऱ्याचे तिने आभार मानले आहेत.

शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे २००९ मध्ये लग्न झाले आहे. २०१२ मध्ये त्यांनी मुलगा वियान राज यांचे स्वागत केले. फेब्रुवारी २०२० मध्ये या दोघांनी सरोगसीच्या माध्यमातून मुलगी समिशाचे पालक बनल्याचे जाहीर केले होते.

हेही वाचा - अभिनेत्री शिल्पा शेटीचे पहिल्यांदाच मुलीसोबतचे फोटो आले समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.