ETV Bharat / sitara

फराझ खानच्या प्रकृतीत सुधारणा - पूजा भट्ट - Faraz Khan latest news

अभिनेता फराझ खानच्या मेंदूत इन्फेक्शन झाले होते, हे इन्फेक्शन छातीपर्यंत पसरले होते. यासाठी २५ लाखांचा खर्च उभा करण्यासाठी कुटुंबीयांनी निधी जमा केला होता. आता त्याच्यावर बंगळूरमध्ये उपचार सुरू असून त्याची तब्येत सुधारत असल्याचे अभिनेत्री पूजा भट्टने म्हटले आहे.

Faraz Khan
फराझ खान
author img

By

Published : Oct 23, 2020, 3:44 PM IST

मुंबई - अभिनेत्री-चित्रपट निर्माती पूजा भट्ट हिने बॉलिवूड अभिनेता फराझ खानच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. तिने लिहिलंय की, त्याची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. १४ ऑक्टोबर रोजी फराझ याच्या मेंदूत इन्फेक्शन झाले होते, हे इन्फेक्शन छातीपर्यंत पसरले होते.

  • Gratitude to all you truly special,generous people who spread the word & contributed towards the medical treatment of #FaraazKhan Am told he is showing improvement & that the family managed to raise ₹ 14,45,747 of ₹25,00,000 as of today. Let’s keep this going🙏 https://t.co/jgdte69Zcy

    — Pooja Bhatt (@PoojaB1972) October 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फराझला बेंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तो जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करीत होता. आता पूजा भट्ट हिने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती देताना त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी निधी उभारून मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

पूजाने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे, "फराझच्या उपचारात मदत करणार्‍या सर्व लोकांचे आभार. फराज खानची प्रकृती सुधारत आहे आणि २५ लाखांपैकी १४,४५,७४७ लाख रुपये त्याच्या कुटुंबीयांनी जमा केले आहेत."

१९९६ मध्ये आलेल्या विक्रम भट्ट यांच्या 'फरेब' या चित्रपटात फराझने मुख्य भूमिका साकारली होती. १९९८ मध्ये रिलीज झालेल्या 'मेहंदी' चित्रपटात फराझने राणी मुखर्जीसोबत काम केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.