ETV Bharat / sitara

सोनू सूदला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा, बीएमसीच्या कारवाईला २ दिवसांची स्थगिती - सोनू सूदला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात सोनू सूदला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीने अभिनेता सोनूच्या इमारतीवरील कोणत्याही कारवाईवर १३ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे.

Sonu Sood
सोनू सूद
author img

By

Published : Jan 11, 2021, 5:29 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीने अभिनेता सोनूच्या इमारतीवरील कोणत्याही कारवाईवर १३ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे.

परवानगी नसताना सोनू सूद यांनी ६ मजल्यावरील निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा आरोप बीएमसीने केला आहे. यासंदर्भात बीएमसीने ७ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात सोनू सूद बचावासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला.

यापूर्वीही बीएमसीने सोनू सूद यांना बेकायदा बांधकामांबाबत नोटीस बजावली होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सोनू सूदसुद्धा या नोटीसविरोधात दिवाणी न्यायालयात दाखल झाला होता, पण तेथून त्याला काहीच दिलासा मिळाला नाही.

सोनू सूद यांनी नियमांचे पालन न करता बेकायदेशीर बांधकाम केले, असे तक्रारीत म्हटले आहे. बिनपरवानगी घेता निवासी ठिकाण व्यावसायिक श्रेणीमध्ये सुधारित केले गेले होते. याबाबत २७ सप्टेंबर २०२० रोजी नोटीस देण्यात आली होती. हा कालावधी २६ नोव्हेंबरला संपला होता, त्यानंतर सोनूने उत्तर दिले नाही. पुन्हा ४ जानेवारी रोजी तपासणी करण्यात आली ज्यामध्ये सोनूने नोटीसला उत्तर न देता बेकायदा बांधकाम पूर्ण केल्याचे आढळले. या प्रकरणात, अभिनेताला १३ जानेवारीपर्यंत मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - बॉलिवूड ट्विट प्रकरण; कंगनाला मुंबई उच्च न्यायलयाचा दिलासा कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.