ETV Bharat / sitara

इलियानाने शेअर केला वर्कआऊटनंतरचा फोटो, दिलं 'हे' कॅप्शन - इलियानाने शेअर केला वर्कआऊटनंतरचा फोटो

अभिनेत्रीनं स्वतःचा एक बुमेरँग व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती चटईवर झोपून योगा करत वरील कॅमेऱ्याकडे पाहात आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, माझ्या अप्रिय वर्कआऊटचा सर्वोत्कृष्ट भाग. इलियान तिच्या फिटनेससाठी विशेष चर्चेत असते. अनेकदा ती आपल्या वर्कआऊटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

ileana dcruz post workout pic
इलियानाने शेअर केला वर्कआऊटनंतरचा फोटो,
author img

By

Published : Jun 8, 2020, 8:16 PM IST

मुंबई - अभिनेत्री इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. वर्कआऊट केल्यानंतरच्या या फोटोत विनामेकअपही अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील चमक दिसत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. यात तिने स्पोर्ट्स ड्रेस परिधान केला आहे.

याशिवाय अभिनेत्रीनं स्वतःचा एक बुमेरँग व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती चटईवर झोपून योगा करत वरील कॅमेऱ्याकडे पाहात आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, माझ्या अप्रिय वर्कआऊटचा सर्वोत्कृष्ट भाग. इलियान तिच्या फिटनेससाठी विशेष चर्चेत असते. अनेकदा ती आपल्या वर्कआऊटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास इलियाना लवकरच अजय देवगणची निर्मिती असलेल्या द बिग बूल सिनेमात झळकणार आहे. यात ती अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. १९९२ सालच्या भारतातील सर्वात मोठ्या सिक्युरिटीज घोटाळ्यावर हा चित्रपट आधारित आहे. २३ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.