मुंबई - दोन वर्षांपूर्वी बनलेला 'अंधाधुन' हा चित्रपट अभिनेत्री राधिका आपटेसाठी नेहमी खास राहील. तिला वाटतं की, या चित्रपटाच्यावेळी तिच्यासारखा विचार करणाऱ्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
राधिका म्हणाली, "'अंधाधुन' माझ्यासाठी खूप मनाच्या जवळचा चित्रपट आहे. यामुळे मला माझ्यासारखा विचार करणाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला प्रोत्साहित केले आणि कामाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी मदत केली. श्रीराम राघवन सारखा दिग्दर्शक आणि आयुष्मान खुरानासोबत सहकलाकार म्हणून काम करण्याचा आणि शिकण्याचा अनुभव मिळाला."
'अंधाधुन' चित्रपटाला गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. आयुष्यमानलाही सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्तम ठरणे ही एक मोठी गोष्ट मानली जाते.
अभिनयाचा विचार करता राधिका 'ए कॉल टू स्पाय' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट खऱ्या आयुष्यात जासूस असलेल्या व्यक्तीवर आधारित आहे.