ETV Bharat / sitara

Kangana Ranaut Lock Upp : कंगना रणौतचा 'लॉक अप' शो अडचणीत, कोर्टाने दिले स्थिगितीचे आदेश - Kangana Ranaut show Lock Upp

हैदराबाद शहर दिवाणी न्यायालयाने ( Hyderabad Civil Court ) कंगना राणौतचा आगामी रिअॅलिटी शो 'लॉक अप' (Kangana Ranaut show Lock Upp ) रिलीज करण्यावर अंतरिम मनाई आदेश जारी केला आहे.

कंगना रणौतचा 'लॉक अप' शो
कंगना रणौतचा 'लॉक अप' शो
author img

By

Published : Feb 26, 2022, 2:02 PM IST

हैदराबाद : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादच्या सिटी सिव्हिल कोर्टाने ( Hyderabad Civil Court ) कंगना राणौतच्या आगामी रिअॅलिटी शो 'लॉक अप'च्या ( Kangana Ranaut show Lock Upp ) प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे.

याचिकाकर्ते आणि उद्योगपती सनोबर बेग यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे, ज्यामध्ये कंगनाच्या शो 'लॉक अप'चे स्वरूप याचिकाकर्त्याच्या रजिस्टर आयडिया 'द जेल'च्या स्क्रिप्टशी जुळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सनोबर बेग यनी 'द जेल' हा शो विकसीत केला होता आणि त्याची रितसर नोंदणीही केली होती. याच शोवर आधारित कंगना होस्ट करीत असलेला 'लॉक अप' हा शो आहे.

कोर्टाने कंगनाच्या आगामी शो 'लॉक अप' च्या ट्रेलरची व्हिडिओ क्लिप देखील रेकॉर्डवर घेतली आणि निष्कर्ष काढला की तो याचिकाकर्त्याच्या शोसारखाच आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया इत्यादींवर तत्काळ नोटीस देऊन शो दाखवण्यास मनाई करणारा आदेश न्यायालयाने जारी केला आहे. लॉक अप हा शो उद्या 27 फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार होता.

हेही वाचा - कंगना रणौतने स्वतःचेच शब्द गिळले, आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'चे केले कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.