ETV Bharat / sitara

हृतिक रोशन आणि दीपिका 'फाइटर' चित्रपटासाठी सज्ज - हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच एकत्र

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच 'फाइटर' चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून चित्रपटाच्या स्टार कास्टनेही यासाठी तयारी दर्शविली आहे.

Hrithik Roshan and Deepika r
हृतिक रोशन आणि दीपिका
author img

By

Published : Jul 9, 2021, 9:31 PM IST

मुंबई - बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय स्टार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच 'फाइटर' चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून चित्रपटाच्या स्टार कास्टनेही यासाठी तयारी दर्शविली आहे. हृतिक रोशनने यासंदर्भात फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये तो दीपिका पादुकोण आणि 'फाइटर' चित्रपटाच्या टीमसोबत दिसत आहे.

या फोटोमध्ये हृतिक रोशन ब्लॅक टी-शर्ट आणि कॅपमध्ये दजिसत असून दीपिका लाल रंगाच्या ड्रेसमध्ये मोकळ्या केसांसह खूपच सुंदर दिसत आहे. हृतिकने फोटोला कॅप्शन दिलंय, ''ही गँग टेक ऑफ करण्यासाठी सज्ज आहे.'' आतापर्यंत या फोटोला १७ लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलंय. यामध्ये आलिया भट्टसह अनेक सेलेब्रिटींचा समावेश आहे.

हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त 'फाइटर' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. 2022 मध्ये हा चित्रपट रिलीज करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सिद्धार्थ आनंद चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हृतिक रोशन अखेरचा वॉर या चित्रपटात दिसला होता. ‘विक्रम वेधा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशनही दिसणार असल्याची बातमी आहे. त्याचबरोबर लवकरच दीपिका पादुकोण आगामी '83' आणि 'पठाण' या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा - संजीव कुमार आणि गुरुदत्त यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतींना वंदन!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.