मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होता. आता कर्करोगावर उपचार घेऊन परतल्यानंतर इरफान बॉलिवूडमधील कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. आगामी अंग्रेजी मीडियम चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतंच चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. इरफानसोबतचा एक फोटो शेअर करत त्यांनी याला कॅप्शनही दिले आहे. इरफान तू एक अप्रतिम कलाकार आहेस. मला कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट बनवायचा होता. मात्र, हा चित्रपट तयार होणं काहीसं अशक्य वाटत होतं. अशात आता संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळं हा चित्रपट बनला आणि हा प्रवास माझ्यासाठी खूप भावनिक होता. मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं आभार मानेल, की त्यांनी मला हा चित्रपट पूर्णत्वास नेण्यास मदत केली, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान इरफान लंडनमध्ये कर्करोगावर उपचार घेत असल्याने चित्रपटाचा बहुतेक भाग लंडनमध्येच शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर राधिका मदन, डिंपल कपाडिया, दीपक डोबरियाल आणि मनू ऋषी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.