शिमला : सुशांत सिंह प्रकरणात वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. कंगनाचे वडील आणि बहिणीने फोन करत सुरक्षा मागितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंगनाच्या कुटुंबीयांनी सुरक्षेमध्ये वाढ करण्याची मागणी केल्यामुळे, आपण तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. गरज पडल्यास महाराष्ट्रातही आपण तिला सुरक्षा पुरवण्याबाबत विचार करत असल्याचेही जयराम यांनी स्पष्ट केले.
कंगना रणौत आणि संजय राऊत यांच्यामध्ये काही दिवसांपासून ट्विटर वॉर सुरू आहे. कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. याबाबत प्रतिक्रिया देताना, कंगनामध्ये अहमदाबादला 'मिनी पाकिस्तान' म्हणण्याची हिंमत आहे का? असा सवाल राऊत यांनी केला होता. यासोबतच, शिवसेनेकडून कंगणाला मुंबईत येऊ देणार नाही अशा धमक्याही देण्यात येत होत्या.
त्यावर प्रत्युत्तर म्हणून कंगनाने व्हिडिओ पोस्ट केला होता. मी नऊ सप्टेंबरला मुंबईला येत असून, आपण मुंबईमध्येच भेटू असे ती आपल्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे.
हेही वाचा : अहमदाबादला 'मिनी पाकिस्तान' म्हटल्याप्रकरणी राऊतांनी माफी मागावी - भाजप