मुंबई - कोरोना दरम्यान चित्रपट आणि टीव्ही शोचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. कोरोनाच्या या काळात एखादा रोमँटिक सीन असेल तर त्याचे शूट कसे केले जाईल, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. अभिनेता अपारशक्ति खुरानाने आपल्या आगामी चित्रपटातील एक दृश्य शेअर केले असून कोरोना काळात रोमॅन्टिक दृश्य कसे शूट केले जाईल, हे सांगितले आहे.
अपारशक्ति खुरानाचा 'हेल्मेट' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रनुतन बहल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या एका सीनचा फोटो अपारशक्ति शेअर केला आहे. अपारशक्तीने शेअर केलेल्या एका फोटोत तो आणि प्रनुतन रोमान्स करताना पाहायला मिळत आहेत. दुसरा फोटो अपारशक्तीने एडीट केला असून दोघांनाही फेस शील्ड घातले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
“हे चांगले आहे की हेल्मेट चित्रपटातील हे शूटिंग कोरोनाच्या पूर्वी शूट झाले होते. नाहीतर आम्हाला अशा दृश्यांच्या शूटिंगसाठी 'संरक्षणाची' गरज भासली होती. संरक्षण म्हणजे मास्क, असे त्याने म्हटलं आहे. दरम्यान लॉकडाऊनमध्ये अपारशक्ती सध्या चंदीगडमध्ये आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्चपासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पाचव्या टप्प्यात शिथिलता देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेलं शूटिंग आता पुन्हा सुरू झाले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शूटिंगबाबत ही काही नियम बनवले गेलेले आहेत. त्यामुळे या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत शूटिंग केलं जात आहे.