मुंबई - बॉलिवूड स्टार रणबीर कपूरने आपल्या आगामी अॅनिमल या चित्रपटाच्या घोषणेसह नवीन वर्षाची सुरुवात केली होती. परिणीती चोप्रा, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या गुन्हेगारी ड्रामा चित्रपट २०२२ च्या दसऱ्याला रिलीज होणार आहे. आता हा चित्रपट लवकरच फ्लोअरवर जाईल.
कबीर सिंग चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित अॅनिमल या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करीत आहेत. एका वेबलोडशी बोलताना, भूषण यांनी हे उघड केले आहे की, तो रणबीरसहित एक नव्हे तर दोन चित्रपट तयार करत आहे. अॅनिमल आणि लव्ह रंजनसोबत आणखी एका चित्रपटात रणबीर कपूर काम करणार आहे.
“रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या लव्ह रंजन यांच्या चित्रपटाचे शूटिंग जवळजवळ पूर्ण झाले आहे. उर्वरित चित्रपटाचे लवकरच शूटिंग होणार आहे. त्यानंतर आम्ही संदीप वंगा यांच्यासोबत अॅनिमलचे शूटिंग करणार आहोत. आम्ही शुटिंगला ऑक्टोबरपर्यंत सुरुवात करणार आहोत'', असे भूषण म्हणाला.
हेही वाचा - परेश रावल यांना कोरोनाची बाधा, काही दिवसापूर्वीच घेतली होती लस