ETV Bharat / sitara

गरोदरपणातील वजन घटवण्यासाठी घाम गाळतेय करिना - वजन घटवण्यासाठी घाम गाळतेय करिना

करिना कपूर खान अवघ्या महिन्याच्या प्रसूतीच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर परतली आहे. शुटिंगला सुरुवात करण्यासाठी ती पुन्हा आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे.

Kareena Kapoor
करिना कपूर खान
author img

By

Published : Apr 19, 2021, 7:38 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान अवघ्या महिन्याच्या प्रसूतीच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर परतली आहे. फेब्रुवारी महिन्यात तिने दुसर्‍या मुलाला जन्म दिल्यानंतर आता ती पुन्हा शुटिंगच्या कामाला सुरुवात करणार आहे.

रविवारी, करिनाने तिच्या स्मार्टवॉचवरील कॅलरी बर्न काऊंटची एक झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "लॉकडाउन म्हणजे हार मानणे नव्हे." करिनाच्या या पोस्टवर भरपूर प्रतिक्रिया उमटत आहेत.

यावर्षी २१ फेब्रुवारीला करिना आणि तिचा नवरा अभिनेता सैफ अली खान यांना दुसऱ्यांदा मुलगा झाला. सैफने यापूर्वीच सउटिंगला सुरुवात केली आहे. आता किनाही पुन्हा सज्ज होत आहे.

चित्रपटाच्या पातळीवर करिना अंग्रेजी मेडियम या चित्रपटात शेवटची दिसली होती. त्यानंतर आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या लालसिंग चड्ढामध्ये ती दिसणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित, लालसिंग चड्ढा हा बॉलिवूड चित्रपट हा हॉलिवूड क्लासिक फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.