मुंबई - अभिनेता जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी सलमान खानच्या आगामी राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटात भावंडांची भूमिका करताना दिसतील. वास्तविक जीवनात मात्र दिशा जॅकीचा मुलगा टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दिशा सेटवर त्याला कोणत्या नावाने हाक मारली असे विचारले असता 'सर किंवा अंकल' या नावाने हाक मारत होती असे उत्तर त्याने दिलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अलीकडेच एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत जॅकीला विचारण्यात आले होते की दिशाने त्याला सेटवर कोणत्या नावाने हाक मारली. त्यावर जॅकी म्हणाला, ''बरं, बऱ्याच वेळेला कुणीही नावाने कुणीही हाक मारत नाही. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र असतात तेव्हा ते नावाने हाका मारत नाहीत. यात काहीही सांगण्यासारखे नाही. परंतु मला जितके आठवते त्यानुसार ती मला सर म्हणून काही वेळा हाक मारत असे. अंकल बहोत अलग सा लगता है. मैं आपके बाप का भाई कैसे हो सकता? दोनो के परिवार अलग है.'', असे जॅकीने सांगितले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
टायगर आणि दिशाच्या डेटिंग अफवा गेल्या दोन वर्षांपासून पसरत असतात. मात्र अध्यापही दोघांनी याला दुजोरा दिलेला नाही. २०१९ मध्ये जॅकीने म्हटले होते की टायगर आणि दिशा 'भविष्यात लग्न करू शकतात किंवा आयुष्यभर मित्र राहू शकतात'.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हा चित्रपट ZEE5 वर ZEE5 चा पे-व्ह्यू- सर्व्हिस ZEEPlex वर एकाच वेळी प्रदर्शित होईल. तसेच डिश, D2H, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्हीसह सर्व आघाडीच्या ऑपरेटरवर प्रदर्शित होईल. सरकारने जारी केलेल्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करून राधे जगभरातील चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित होईल.
सध्याच्या अनिश्चिततेमुळे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेपासून माघार घेत आहेत. परंतु ''राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई" चित्रपटाने ठरलेल्या तारखेला रिलीज होणार आहे.
हेही वाचा - सलमान खानचा बहुप्रतीक्षित ''राधे'' चित्रपटाचे होणार हायब्रीड रिलीज