ETV Bharat / sitara

होली २०२० : बॉलिवूड सिताऱ्यांनी चाहत्यांना रंगा-ढंगात दिल्या चाहत्यांना शुभेच्छा - कोरोना व्हायरसपासून सावध राहण्याचा सल्लाही दिलाय.

आज देशभर होळी सणााचा माहोल आहे. लोक आनंदाच्या रंगांची उधळण करीत आहेत. अशावेळी बॉलिवूड सिताऱ्यांनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत कोरोना व्हायरसपासून सावध राहण्याचा सल्लाही दिलाय.

colorful wishes for fans
रंगा-ढंगात दिल्या चाहत्यांना शुभेच्छा
author img

By

Published : Mar 10, 2020, 12:15 PM IST

मुबंई - आज देशभर होळीचा सण साजरा होत असताना कोरोना व्हायरसची धास्तीही आहे. रंगांची उधळण करीत सणाचा आनंद लोक घेत आहेत. बॉलिवूडमध्येही होळीची धूम आहे. बॉलिवूड सेलेब्रिटीजनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना कोरोना व्हायरसपासून सावध राहण्याचा सल्लाही दिलाय.

ऋषि कपूर, तापसी पन्नू, अनुपम खेर आणि दीपिका पादुकोण यांच्यासह अनेक बॉलिवूड सिताऱ्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऋषी कपूर यांनी लहानपणीचा होळी खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. ऐश्वर्या राय बच्चननेही आराध्यासोबत होळी खेळतानाचा फोटो शेअर केलाय.

ऋषी कपूर यांच्या लहानपणीच्या फोटोत ते रंगात रंगलेले दिसतात. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, सर्वांना सुरक्षीत होळीच्या शुभेच्छा. कोरोना पासून सावध रहा.

अभिनेत्री तापसी पन्नूने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांचे एक ट्विट शेअर केला आहे. होळीच्या सुट्टीमध्ये थप्पडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होईल असे त्यांनी लिहिले होते.

  • Happy Holi everyone ! Or rather I should say....
    ‘Bura na maano Holi hai’
    Spread Love n be happy ! 😁 https://t.co/HOfl6fasuB

    — taapsee pannu (@taapsee) March 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेत्री सनी लिओनीनेही होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केलंय.

अभिनेत्री परिणीती चोप्राने चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केलाय.

दरम्यान दीपिका पदुकोणने चाहत्यांसाठी तिच्या काही आउटफिटचा लिलाव करीत असल्याचे कळवत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मल्लिका शेरावतने लिहिलंय, ''सर्वांना होळीच्या शुभेच्छा. हॅप्पी कलरफुल होळी.''

  • Wishing everyone a very happy & a colorful holi 🙏 #HappyHoli2020

    — Mallika Sherawat (@mallikasherawat) March 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच करिना कपूर, अनुपम खेर, दिया मिर्झा, भूमी पेडणेकर, ऐश्वर्या राय बच्चन यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.