मुंबई - बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसाठी न्यू नॉर्मल म्हणजे ग्रीन नॉर्मल ठरत आहे. अनेकांनी मांसाहारी आहाराला सोडचिठ्ठी देऊन शाकाहाराचा मार्ग स्वीकारला आहे. लॉकडाऊनच्या काळात असे अनेक बदल त्यांनी आपल्या जीवनशैलीत केले आहेत. काहींनी आरोग्यदायी जगण्यासाठी शाकाहारांचा अवलंब केलाय. आम्ही यांची एक यादीच बनवली आहे.
भूमी पेडणेकर
लॉकडाऊन दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आणि पर्यावरणवादी भूमी पेडणेकर शाकाहारी झाली आहे. आता तिला हा आहार आवडू लागलाय. ती म्हणाली, "मी शाकाहारी बनून सहा महिने झाले आहेत आणि मी चांगली आहे, अपराध मुक्त झालो असल्याचे मला वाटते आहे. बऱ्याच वर्षापासून हे पाऊल मला उचलायचे होते. पर्यावरण योध्याचे काम करताना खूप काही शिकायला मिळाले.''
शिल्पी शेट्टी कुंद्रा
अभिनेत्री आणि फिटनेस प्रेमी शिल्पाने जुलैमध्ये खुलासा केला होता की ती पूर्णपणे शाकाहारी झाली आहे. ती म्हणाले, "जेवणासाठी जनावरे मारुन खाण्यामुळे केवळ जंगले नष्ठ झाली नाहीत तर पर्यावरणातही बदल झाले. याशिवाय शाकाहारी बनणे आमच्या आणि पृथ्वीच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.''
रितेश देशमुख
या महिन्याच्या सुरुवातीला रितेशने शेअर केले होते की त्याने नॉन व्हेज, ब्लॅक कॉफी आणि गॅस असलेली पेये यांचे सेवन करणे बंद केले आहे. तो म्हणाला, ''मला अवयव दान करायचे आहेत. अवयव दान करण्याचा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा लोकांनी म्हटले पाहिजे की, जाता जाता निरोगी अवयव सोडून गेला.''
जेनेलिया देशमुख
लॉकडाऊनच्या दरम्यान, जेनेलिया देशमुखने सांगितले, "मी काही वर्षांपूर्वी शाकाहारी बनण्याचे ठरविले होते, मला ते करणे कठीण होते. परंतु मला ते अंमलात आणण्यावर ठाम होते. मला वनस्पतींच्या सुंदरतेचा अनुभव आला. त्यानंतर मी त्यातून मिळणाऱ्या पोषक अन्न तत्वांच्यावर लक्ष दिले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जनावरांबद्दल मी क्रूर नाही ही गोष्ट बरी वाटली."
संजय दत्त
एप्रिलमध्ये अभिनेता संजय दत्तने नॉन व्हेजला रामराम ठोकला होता.
याखेरीज अक्षय कुमार, शाहिद कपूर, करीना कपूर खान, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर, मलाइका अरोरा, आणि विद्युत जामवाल यासारखे अनेक सेलिब्रिटींनी शाकाहार स्वीकारला आहे.