ETV Bharat / sitara

VIDEO: ढगाला लागली कळ.., ड्रीम गर्लच्या गाण्यात रितेशनं धरला आयुष्मानसोबत ठेका - नुसरत भरुचा

ड्रीम गर्ल चित्रपटात हे गाणं पाहायला मिळणार आहे. या मराठमोळ्या गाण्याची एक झलक प्रदर्शित करण्यात आली असून यात आयुष्मान आणि नुसरत भरुचासोबत रितेश देशमुखनंही ठेका धरलेलं पाहायला मिळत आहे.

ड्रीम गर्लच्या गाण्यात रितेशनं धरला आयुष्मानसोबत ठेका
author img

By

Published : Aug 26, 2019, 7:40 PM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीत आपल्या विनोदशैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे दादा कोंडके यांची बरीच गाणी तुफान लोकप्रिय ठरली आहेत. आजही त्यांच्या गाण्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. आता त्यांच्या ढगाला लागली कळ या सुपरहिट गाण्याचा रिमेक करण्यात आला आहे.

आयुष्मान खुराणाची मुख्य भूमिका असलेल्या ड्रीम गर्ल चित्रपटात हे गाणं पाहायला मिळणार आहे. या मराठमोळ्या गाण्याची एक झलक प्रदर्शित करण्यात आली असून यात आयुष्मान आणि नुसरत भरुचासोबत रितेश देशमुखनंही ठेका धरलेलं पाहायला मिळत आहे.

गाण्याच्या सुरुवातीला रितेश आणि आयुष्मानचा मराठी संवादही ऐकायला मिळतो. मराठी प्रेक्षकांसाठी हे गाणं नक्कीच खास असणार आहे. मंगळवारी हे संपूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आयुष्मान हा 'ड्रीमगर्ल' चित्रपटात अनोख्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरलाही चाहत्यांची भरभरुन पसंती मिळाली. १३ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

ent 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.