ETV Bharat / sitara

जेनेलियाचा व्हिडिओ व्हायरल, चाहत्याने दिला रितेशला सल्ला - जेनेलिया देशमुख

जेनेलिया देशमुखने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती मॅथ्यू डेव्हिड मॉरिस यांच्या 'लिटल बिट' गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओव्हायरल झाला असून चाहते तिला तर कॉमेंट्स करीत आहेतच पण रितेशलाही टॅग करायला विसरत नाहीत.

Genelia's video goes viral
जेनेलिया देशमुख
author img

By

Published : Jun 26, 2021, 7:11 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख तिच्या गोड हास्यासाठी ओळखली जाते. इंस्टाग्रामवर जेनेलिया डिसोझाचे ५७ लाखाहून अधिक चाहते आहेत. या चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी ती नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असते. जेनेलियाने पुन्हा एकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात ती सांगत आहे की कधीकधी तीसुद्धा थोडीशी ब्रट्टी (Bratty) होते. ब्रटी म्हणजे खराब वागणे.

जेनेलिया देशमुखने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती मॅथ्यू डेव्हिड मॉरिस यांच्या 'लिटल बिट' गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. ती ग्रीन टॉप आणि जीन्समध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱयावर उमटलेले भावदेखील पाहण्यासारखे आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, - "कारण ब्रटी बनणे ही माझी खासियत आहे."

यासोबतच तिने बर्‍याच स्माइली इमोजीही पोस्ट केल्या आहेत. जेनेलिया देशमुखच्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी खूपच पसंत केले आहे. आतापर्यंत तिच्या या व्हिडिओला ४ लाख ६६ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हार्ट व फायर इमोजी बनवून बहुतेक चाहते प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. रितेश देशमुखला टॅग करीत एका चाहत्याने लिहिले - "देख ले भाई।"

जेनेलिया डिसूझाने २००३ मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि २०१२ मध्ये तिने रितेश देशमुखशी लग्न केले होते. बऱ्याच तेलुगू चित्रपटांव्यतिरिक्त, जेनेलियाने 'मस्ती' आणि 'जाने तू या जाने ना' सारख्या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा - 'माझा होशील ना' मध्ये दिसणार पिस्तूल आणि गोळीबार!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.